मुंबई : नववर्षाला अवघे काही तास शिल्लक असल्याने यंत्रणांनी स्वागताची जोरदार तयारी केली आहे. ३१ डिसेंबरला सेलिब्रेशनसाठी घराबाहेर असणाऱ्या मुंबईकरांसाठी मध्यरात्री विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. चर्चगेट ते विरार मार्गावर आठ अतिरिक्त धीम्या लोकल चालवण्याची घोषणा पश्चिम रेल्वेने केली. मध्य आणि हार्बर रेल्वेसह एकूण १२ विशेष लोकल धावणार आहेत. शहरातील हॉटेल, पब, डिस्को रात्री उशिरापर्यंत चालू राहणार आहेत. यामुळे सरत्या वर्षाला निरोप देताना मध्यरात्र उलटल्यास घरी पोहोचण्याची चिंता मिटणार आहे.
३१ डिसेंबरला मध्यारात्रीनंतरच्या विशेष लोकल
३१ डिसेंबरला मध्यारात्रीनंतरच्या विशेष लोकल
मध्य रेल्वे (मुख्य मार्ग)
सीएसएमटी-कल्याण – मध्यरात्री १.३०
कल्याण-सीएसएमटी – मध्यरात्री १.३०
हार्बर रेल्वे
सीएसएमटी-पनवेल – मध्यरात्री १.३०
पनवेल-सीएसएमटी- मध्यरात्री १.३०
पश्चिम रेल्वे
चर्चगेट ते विरार – मध्यरात्री १.१५, २.००, २.३०, ३.२५
विरार ते चर्चगेट – मध्यरात्री १२.१५, १२.४५, १.४०, ३.०५