करोनाचे रुग्ण वाढले, राज्यात टास्क फोर्सची स्थापना; डॉ. रमण गंगाखेडकर अध्यक्षपदी

म. टा. प्रतिनिधी, पुणे: राज्यात करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ असल्याने पुन्हा ‘करोना टास्क फोर्स’ सुरू करण्यात आला आहे. या ‘टास्क फोर्स’च्या अध्यक्षपदी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर यांची सदस्यपदी नियुक्ती केली आहे. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते, पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेतील (एनआयव्ही) डॉ. वर्षा पोतदार, नवले वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. डी. बी. कदम, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक यांची सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. आरोग्य सेवा आयुक्त ‘टास्क फोर्स’चे सदस्य सचिव असणार आहेत. करोना विषाणूचा नवीन उपप्रकार असलेल्या ‘जेएन-१’ विषाणूचे रुग्ण गेल्या काही दिवसांत आढळून आले आहे. त्यामुळे उपाययोजना करण्यासाठी टास्क फोर्स सुरू करण्यात आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

JN.1 : गरजेच्या ठिकाणी मास्क घाला, जेएन१ चा धोका वाढला, महाराष्ट्रातही आरोग्य विभाग सतर्क

‘टास्क फोर्स’ काय करणार?

– उपचारांमध्ये एकसमानता राखण्यासाठी औषध नियमावलीची शिफारस करणे.

– आरोग्य विभागाला उपाययोजना सुचविणे.

– रुग्ण व्यवस्थापन करणे.

– करोना प्रादुर्भावाचे अभ्यासात्मक विश्लेषण करणे.

– तज्ज्ञ डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेची शिफारस करणे.

चिंता नको पण खबरदारी घ्या

करोना संकट पुन्हा डोके वर काढत असून, जेएन-१ हा नवा व्हेरिएंट आढळून आल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे. लहान मुलांच्या आरोग्याबाबत हलगर्जीपणा नको, तर आवश्यक काळजी घेण्याचा सल्ला बालरोग तज्ज्ञांकडून दिला जातो आहे. लसीकरण, विषाणूची लागण होऊ नये म्‍हणून सावधगिरीचे उपाय व लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार घेण्याचेही सुचविले जाते आहे.

यापूर्वीच्या करोना महामारीच्या काळात तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक मानली गेली होती. परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर जनजीवन सुरळीत झाल्याचे बघायला मिळत होते. परंतु, नुकताच करोनाच जेएन-१ व्हेरिएंटचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली असून, यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. बालकांची विशेष काळजी घेण्याबाबतही आरोग्य व्यवस्थेकडून सुचविले जात आहे.

Kerala Corona Cases: केरळमध्ये करोनाची लाट, २४ तासांत ३०० पॉझिटिव्ह रुग्ण, तिघांचा मृत्यू

घरगुती उपाय टाळा

अनेकदा सामान्य सर्दी-खोकला जाणवल्यास घरगुती स्वरुपात उपचार घेतले जातात. परंतु, सध्याच्या परीस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता आजारपणात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार पूर्ण करण्याचा सल्ला दिला जात आहे. डॉक्टरांनी सुचविल्यास आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याबाबतही आवाहन केले जात आहे.

Source link

coronaviruscovid task force maharashtracovid-19jn1Raman Gangakhedkarकरोना टास्क फोर्सरमण गंगाखेडकर
Comments (0)
Add Comment