१६जीबी रॅमसह iQOO Neo 9 आणि iQOO Neo 9 Pro चीनमध्ये लाँच, जाणून घ्या किंमत

होम मार्केट चीनमध्ये आयक्यू नियो ९ सीरीज सादर करण्यात आली आहे. ह्यात iQOO Neo 9 आणि iQOO Neo 9 Pro अश्या दोन फ्लॅगशिप मॉडेलची एंट्री झाली आहे. दोन्ही मोबाइलमध्ये १६ जीबी रॅम, १ टीबी स्टोरेज, ५० एमपी कॅमेरा, ५१६० एमएएचची बॅटरी, ६.७८ इंचाचा १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेट डिस्प्ले असे अनेक शक्तिशाली फीचर्स मिळत आहेत. चला, पुढे तुम्हाला नियो ९ आणि प्रो व्हर्जन च्या फुल स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची माहिती देण्यात आली आहे.

iQOO Neo 9 आणि iQOO Neo 9 Pro चे स्पेसिफिकेशन्स

iQOO Neo 9 आणि iQOO Neo 9 Pro स्मार्टफोन्समध्ये युजर्सना ६.७८ इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. ह्यावर ९३.४३% स्क्रीन टू बॉडी रेश्यो, २८०० x १२६० पिक्सल रिजॉल्यूशन, एचडीआर १० टेक्नॉलॉजी आणि १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळतो.
फोनचा प्रोसेसर पाहता प्रो मॉडेलमध्ये कंपनीनं ४ नॅनोमीटर प्रोसेसवर आधारित ऑक्टा कोर Dimensity 9300 चिपसेट दिला आहे. त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी Immortalis-G720 जीपीयू मिळतो. बेस Neo 9 मॉडेल क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन २ चिपसेट आणि एड्रिनो ७४० जीपीयू सह बाजारात आला आहे. दोन्ही डिवाइस १६ जीबी LPDDR5X रॅम आणी १ टीबी UFS4. 0 इंटरनल स्टोरेज देतात.

नियो ९ मोबाइलमध्ये OIS सह ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. प्रो मॉडेल OIS सपोर्टसह ५० मेगापिक्सलच्या मुख्य आणि ५० मेगापिक्सलच्या सेकंडरी कॅमेर्‍यासह बाजारात आला आहे. हा फोन २०एक्स डिजिटल झूमला सपोर्ट करतो. फ्रंटला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

दोन्ही स्मार्टफोन ५१६० एमएएचची बॅटरी आणि १२०वॉट अल्ट्रा फास्ट फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करतात. iQOO Neo 9 आणि iQOO Neo 9 Pro मॉडेलमध्ये ड्युअल सिम 5G, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, वाय-फाय ७, ब्लूटूथ, यूएसबी टाइप सी सपोर्ट सारखे अनेक फीचर्स आहेत. ऑपरेटिंग सिस्टम पाहता iQOO Neo 9 आणि iQOO Neo 9 Pro स्मार्टफोन लेटेस्ट अँड्रॉइड १४ आधारित ओरिजन ओएस ४ वर चालतात.

iQOO Neo 9 आणि iQOO Neo 9 Pro ची किंमत

iQOO Neo 9 आणि 9 Pro मोबाइल्स चार स्टोरेज ऑप्शनमध्ये सादर झाले आहेत. iQOO Neo 9 ची किंमत २,२९९ युआन (सुमारे २७,६७५ रुपये) पासून सुरू होते,ज्यात १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज मिळते. १२ जीबी रॅम व २५६ जीबी स्टोरेज असलेला iQOO Neo 9 Pro चा बेस मॉडेल २,९९९ युआन (जवळपास ३४,९५४ रुपये) मध्ये खरेदी करता येईल. मोबाइल रेड आणि व्हाइट सोल ड्युअल-टोन लेदर टेक्सचर्ड बॅक पॅनलसह आला आहे त्याचबरोबर नॉटिकल ब्लू आणि फाइटिंग ब्लॅक सारखे कलरचा देखील समावेश आहे. लवकरच हे फोन्स भारतात देखील येण्याची शक्यता आहे.

Source link

iqoo neo 9iqoo neo 9 launchiqoo neo 9 priceiqoo neo 9 proiqoo neo 9 pro launchiqoo neo 9 pro price
Comments (0)
Add Comment