नुकतीच ‘एआयईएसएल’ ने याबाबत अधिसूचना जाहीर केली आहे. यानुसार इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून १५ जानेवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या –
पदाचे नाव -सहाय्यक पर्यवेक्षक / नोकरीचे ठिकाण आणि पदसंख्या –
मुंबई – ७० जागा
नागपुर – १० जागा
दिल्ली – ८७ जागा
हैदराबाद – १० जागा
कोलकाता – १२ जागा
तिरूअनंतपुरम – २० जागा
एकूण रिक्त पदसंख्या – २०९ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून तीन वर्ष पूर्ण वेळ अभ्यासक्रमसह आर्ट्स, सायन्स, कॉमर्स आदि विषयातून पदवीधर असावा. तसेच त्याला संबधित कामाचा एका वर्षाचा अनुभव असावा. या व्यतिरिक्त विस्तृत पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.
वयोमर्यादा – कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे आहे. कमाल वयोमर्यादेत ओबीसी प्रवर्गाला ०३ वर्षे तर एससी/एसटी प्रवर्गाला ०५ वर्षे सवलत आहे.
अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ जानेवारी २०२४
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ”एआय इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरतीसंदर्भात अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच १५ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.