वनप्लस १२ सीरिजचा सर्वात स्वस्त फ्लॅगशिप स्मार्टफोन ‘ह्या’ रंगात येईल भारतात; कंपनीनं केली घोषणा

वनप्लसनं डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला वनप्लस १२ चीनमध्ये लाँच केला आहे. तसेच ह्याची ग्लोबल आणि भारतीय लाँच डेट देखील कंफर्म झाली आहे. तसेच, आता OnePlus 12 सह OnePlus 12R येणार असल्याचं देखील कंफर्म झालं आहे. हे दोन्ही मोबाइल एकाच दिवशी म्हणजे २३ जानेवारीला भारत आणि ग्लोबल बाजारात येतील. कंपनीनं आज नवीन टीजर जारी करत कलर ऑप्शन देखील शेयर केले आहेत. चला, जाणून घेऊ डिवाइस संबंधित संपूर्ण माहिती.

OnePlus 12R लाँच आणि कलर ऑप्शन कंफर्म

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स आणि कंपनीच्या वेबसाइटवर वनप्लस १२ सीरीजच्या १२आर स्मार्टफोनची लाँच डेट आणि कलर ऑप्शन कंफर्म करण्यात आले आहेत. त्यानुसार हा डिव्हाइस ब्लॅक आणि ब्लू कलर ऑप्शनमध्ये ग्लोबली सादर केला जाईल. असं देखील सांगण्यात आलं आहे की भारतात या फोनचा Mingsha Gold कलर थोडा उशिरा लाँच होईल. तसेच OnePlus 12 आणि OnePlus 12R फोन भारतात २३ जानेवारी २०२४ ला संध्यकाळी ७:३० वाजता लाँच होतील.

OnePlus 12R चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

OnePlus 12R डिव्हाइसमध्ये ६.७८ इंचाचा एक्सडीआर एलटीपीओ ४.० अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो जो १.५के पिक्सल रिजॉल्यूशन, १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस २ च्या सुरक्षेसह येईल.

डिव्हाइसमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन २ चिपसेट आणि एड्रेनो जीपीयू मिळण्याची शक्यता आहे.जोडीला १६जीबी पर्यंत एलपीडीडीआर५एक्स रॅम आणि २५६जीबी पर्यंत यूएफएस ४.० इंटरनल स्टोरेज मिळू शकते. OnePlus 12R स्मार्टफोन लेटेस्ट अँड्रॉइड १४ वर चालू शकतो.

वनप्लस १२आर स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात ५० मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स८९० प्रायमरी कॅमेरा लेन्स, ८ मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलची मॅक्रो कॅमेरा लेन्स मिळू शकते.

मोबाइलमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल सिम ५जी, ब्लूटूथ, वाय-फाय, अलर्ट स्लाइडर सारखे अनेक फीचर्स मिळू शकतात. हा स्मार्टफोन ५५००एमएएचची मोठी बॅटरी आणि १००वॉट फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह येऊ शकतो.

Source link

oneplus 12roneplus 12r color optiononeplus 12r launchoneplus 12r launch in indiaoneplus 12r priceoneplus 12r price in india
Comments (0)
Add Comment