नारायण राणेंवर कारवाई केल्यानंतर महाड न्याय दंडाधिकारी बाबासाहेब शेख यांच्या कोर्टासमोर झालेल्या सुनावणीत नारायण राणेंना जामीन मंजूर करण्यात आला होता. न्याय दंडाधिकाऱ्यांनी अटीशर्ती ठेवून जामीन मंजूर केला होता. त्यानुसार राणेंना एसनसीपीकडे हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले होते. आज नारायण राणे अलिबाग पोलिस ठाण्यात हजेरी लावणार होते. मात्र, तब्येतीच्या कारणास्तव राणे आज हजेरी लावण्यास उपस्थित राहू शकले नाहीयेत.
नारायण राणे यांची प्रकृती ठिक नसल्यानं आज अलिबाग येथे हजेरी लावण्यास हजर राहिले नसून तसा अर्ज त्यांच्या वकिलांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागांमध्ये दिला आहे. राणे यांच्या वतीने त्यांचे वकील हजर झाले होते. नारायण राणे अलिबागला येणार असल्यामुळं परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला होता.
नाशिकः कुलंग किल्ल्यावर १३ जण अडकले; बचावकार्य सुरू
दरम्यान, कोर्टानं राणेंना महिन्यातून दोन वेळा पोलिस स्टेशनमध्ये हजेरी लावण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने राणे यांना १५ हजार रुपयांचा जामीन मंजूर करताना ३० ऑगस्ट आणि १३ सप्टेंबर रोजी अलिबाग (रायगड) येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते.
अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात; दहीहंडी साजरी करण्यावर मनसे ठाम
जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करताना नारायण राणेंनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केला होता. त्यांनी केलेल्या टीकेनंतर राज्यात वातावरण तापले होते. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील शिवसैनिकांनी नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्या पार्श्वभूमीवर राणेंना अटक करण्याचे आदेश काढण्यात आले होते. त्यानुसार राणेंवर कारवाई करण्यात आली होती.