Breaking News: ठाण्यातील ज्यू धार्मियांच्या प्रार्थनास्थळात बॉम्ब ठेवल्याचा मेल, घटनास्थळी पोलिस आणि बॉम्बशोधक पथक

ठाणे : सिव्हिल रुग्णालयासमोर सिनगॉग चौकात असलेल्या ज्यू धार्मियांच्या प्रार्थनास्थळात बॉम्ब ठेवल्याचा अज्ञाताने मेलद्वारे प्रार्थनास्थळ व्यवस्थापनाला पाठवला होता. त्यानंतर घटनास्थळी पोलीस यंत्रणा, बॉम्बशोधक पथक दाखल झाले. खबरदारी म्हणून ठाणे पोलिसांनी याठिकाणी येणारे सर्व रस्ते वाहतुकीसाठी बंद करून सर्व परिसरात शोधकार्य सुरू केले होते.

ठाणे पोलिसांना आज दुपारी १२.३० वाजता माहिती मिळाली. त्यामुळे त्वरित घेऊन याठिकाणी स्टाफ बाहेर काढण्यात आला. त्यांनतर कसून तपासणी करण्यात आली. गुन्हा ही दाखल करण्यात आला आहे. बॉम्ब शोधक पथक आणि डॉग स्कोड पथकाने पाहणी केली. ज्यू समाजाचे प्रार्थना स्थळ असलेल्या सिनेगॉग येथे तपासणी केली असता कोणत्याही प्रकारचा बॉम्ब सापडला नसल्याने पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनी सांगितले.

दरम्यान सदरचा मेल कुठून आला याचा तपास सुरू आहे. बॉम्ब कोणताही आढळून आला नाही. याबाबत सायबर सेल अधिक तपास करीत आहेत, असे
गणेश गावडे, उपायुक्त ठाणे पोलीस यांनी सांगितले.

यावेळी घटनास्थळी पोलीस उपायुक्त परिमंडळ एक गणेश गावडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे, नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर आणि राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खरात उपस्थित होते.

Source link

bomb planted in jewish worshipcivil hospitalsynagogue chowkThaneज्यू धार्मियांच्या प्रार्थनास्थळठाणे बातमीसिनगॉग चौक
Comments (0)
Add Comment