‘आयटीआय’ उमेदवारांसाठी महावितण मध्ये मोठी भरती; जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील

Maharashtra State Electricity Distribution Company Limited Hingoli Recruitment 2024: तुम्ही ‘आयटीआय’ उत्तीर्ण असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर महावितरण मध्ये चांगली संधी चालून आली आहे. ‘महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, हिंगोली’ यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे अप्रेंटीस म्हणजेच शिकाऊ प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण ८० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

‘महावितरण’च्या हिंगोली केंद्राने नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून ११ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तसेच ऑनलाइन अर्जानंतर प्रत्यक्ष छणणी होऊन निवड केली जाईल. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, हिंगोली भरती २०२४’ मधील पदे आणि पदसंख्या –
पदाचे नाव – अप्रेंटीस/ शिकाऊ प्रशिक्षणार्थी
वीजतंत्री विभाग – ४० जागा
तारतंत्री विभाग – ४० जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ८० जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार उमेदवार संबधित ट्रेड मधील आयटीआय उत्तीर्ण असावा.

नोकरी ठिकाण – हिंगोली

अर्ज पद्धती – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ जानेवारी २०२४

या भरतीसंदर्भात प्रसिद्ध झालेली जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरतीकरिता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवाराने शासनाच्या ‘अप्रेंटीसशिप इंडिया’ या संकेतस्थळावर भेट द्यावी.

अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच ११ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा भरलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्या अर्जाची मूळ आणि छायांकित प्रत घेऊन उमेदवारांनी १५ जानेवारी रोजी अर्ज पडताळणी साठी विद्युत भवन मंडळ कार्यालय, हिंगोली येथे प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष उपस्थित राहणार्‍या उमेदवारांचाच विचार केला जाईल.

Source link

Mahavitaran Hingoli Recruitment 2024Mahavitaran Recruitment 2024recruitmentमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती २०२३महावितण हिंगोली भरती २०२४महावितरण भरती २०२४
Comments (0)
Add Comment