वितळला चार्जर
केबल इतकी तापली की चार्जर वितळला आणि युजरनं चार्जरला स्पर्श करता त्याची बोटे भाजली. युजरनं सांगितलं की मला माहित होतं की आयफोन 15 प्रो मॅक्स गरम होतो, परंतु हा फोन एक महिनाभर वापरल्यानंतर रात्रभर चार्ज करताना माझा फोन इतका गरम झाला की खरंच माझा हात भाजला.
युजरनं सांगितलं की जेव्हा त्याने चार्जर काढला तेव्हा त्याचा प्लास्टिक कव्हर पूर्णपणे वितळला होता. तसेच, शरीरावर भाजल्याचे डाग होते आणि यूएसबी-सी पोर्टचा धातु असलेला भाग फोनमध्ये अडकेलला होता.
Apple नं आधीच आपले प्रोडक्ट्स कंपनीच्या चार्जर व्यतिरिक्त दूसरे चार्जरनं चार्ज न करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे ही घटना पाहून असं म्हटलं जात आहे की अॅक्सेसरीजचा वापर Apple च्या सल्ल्याचे पालन करून केलं पाहिजे. ह्यामुळे तुमचा महागडा डिव्हाइसच सुरक्षित राहणार नाही तर तुम्ही देखील अशा दुर्घटनांपासून वाचू शकाल.
Note: चुकूनही बनावट चार्जरनं तुमचा आयफोन चार्ज करू नका नाही तर केव्हाही मोठी दुर्घटना होऊ शकते.
फोन ब्लास्टची कारणे
फोनच्या ब्लास्ट मागे बऱ्याचदा सदोष बॅटरी असते. फोनची जुनी बॅटरी फुगते आणि जर ती तुम्ही चार्ज करण्यासाठी पावर पॉईंटला जोडली तर स्फोट होऊ शकतो. सदोष बॅटरीसह फोन चार्जरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन स्फोट होऊ शकतो. तसेच फोन रात्रभर चार्ज करणे, किंवा २० टक्क्यांपेक्षा कमी चार्जमध्ये फोन वारंवार वापरणे ह्यामुळे ह्यामुळे देखील बॅटरी आणि फोन बिघडू शकतो.