‘मला कुठलीही ईडीची नोटीस मिळाली नाही’, भावना गवळी यांचा खुलासा

हायलाइट्स:

  • ‘मला कुठलीही ईडीची नोटीस मिळाली नाही’
  • भावना गवळी यांचा मोठा खुलासा
  • शिवसेनेच्या लोकांना टार्गेटकरून आणीबाणी सारखी वागणूक – भावना गवळी

वाशिम : मला कुठलीही ईडीची नोटीस मिळाली नाही. माझ्या ऑफिसला पण ईडीची नोटीस बजावली नाही. माझ्या संस्थेवर ईडीचे अधिकारी आलेले आहेत. त्या ठिकाणी चौकशी करत आहे. आणीबाणी सारखं या ठिकाणी सगळ्या शिवसेनेच्या मंत्र्यांना, लोकांना वागणूक दिल्या जात आहे. त्यांना टार्गेट केलं जात आहे, असा आरोप ईडीच्या कारवाई प्रत्युत्तरात शिवसेनेच्या वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांनी केला.

माझ्या संस्थेचा मी स्वतः एफआयआर नोंद केला होता. मला हिशोब मिळाला नाही आणि त्यातलं एक वाक्य पकडायचं, एक आकडा घ्यायचा आणि राईचा पर्वत बनवायचा अशा पद्धतीने या ठिकाणी काही नेत्यांनी मागच्या काही दिवसात खेळ मांडलेला आहे, अशी प्रतिक्रिया भावना गवळी यांनी दिली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ईडीची नोटीसच आली नसल्याचा धक्कादायक खुलासा भावना गवळी यांनी केला आहे.

आज शिवसेनेच्या वाशिम-यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांच्या वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील ५ संस्थांवर ईडीने धाडी टाकल्या आहेत. किरीट सोमय्या यांनी शंभर कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावर केला होता. यासंदर्भात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. याची दखल घेतात ईडीने भावना गवळी यांच्या वाशिम इथं असलेल्या पाच संस्थांवर धाडी टाकल्या आहेत.

त्या पुढे म्हणाल्या की, ‘या भागात पाच टर्मपासून मी खासदार म्हणून काम करत आहे. कदाचित काही लोकांना चांगलं दिसत नाही. आम्ही काम करतो जनतेच्या हिताचं तेही चांगला दिसत नाही. दहा दिवसापूर्वी मी एक मागणी केली आहेय त्यामध्ये या भागातले भाजपाचे एक आमदार आहे ते भूमाफिया आहेत. त्यांनी ५०० कोटींचा घोटाळा केला आहे. त्यासंदर्भात केंद्र सरकार त्यांची ईडीची चौकशी का लावली नाही हा माझा प्रश्न आहे. आणि तुम्ही जशी माझी चौकशी लावली तसी त्यांची चौकशी लावली पाहिजे’ असा आरोप भावना गवळी यांनी केला.

Source link

bhavana gawali latest newsbhavna gavli twitterBJP newsbjp news maharashtrabjp news today livebjp news today maharashtraed probe casemp bhavana gawli
Comments (0)
Add Comment