corona in mumbai updates करोना: मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्येत किंचित घट, मात्र ही चिंता कायम!

हायलाइट्स:

  • गेल्या २४ तासांत मुंबईत ३३४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.
  • गेल्या २४ तासांमध्ये एकूण ३१० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
  • आज राज्यात एकूण २ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई: मुंबई (Corona in Mumbai) महापालिका क्षेत्रात आज कालच्या तुलनेत करोनाच्या (Coronavirus) नव्या रुग्णसंख्येत घट झाली असून मुत्यूंची संख्या घटलेली नसली तरी मृ्त्यूत वाढही झालेली नाही. गेल्या २४ तासात ३३४ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. काल ही संख्या ३४५ इतकी होती. तर, दिवसभरात ३१० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कालच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. काल ही संख्या २८० इतकी होती. गेल्या २४ तासांत मुंबईत करोनाने २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल देखील दिवसभरात २ मृत्यूंची नोंद झालेली आहे. (mumbai registered 334 new cases in a day with 310 patients recovered and 2 deaths today)

याबरोबरच, मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख २२ हजार ३४९ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण १५ हजार ९७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९७ टक्के इतके असून कोविड रुग्णवाढीचा दर ०.०५ टक्के इतका आहे. त्याचवेळी मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी आता १ हजार ५७७ दिवसांवर जाऊन पोहचला आहे.

क्लिक करा आणि वाचा- रोहित पवारांचा दे धक्का, चंद्रकांत पाटलांची पाठ फिरताच ‘यांचा’ भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबईत आज ३३ हजार ३९१ चाचण्या

मुंबईत आज एकूण ३३ हजार ३९१ कोविड चाचण्या करण्यात आल्या असल्याचे मुंबई महानगरपालिकेने सांगितले आहे. सध्या झोपडपट्टी व चाळींमध्ये एकही सक्रिय कंटेनमेंट झोन नसून एकूण २७ इमारती सील करण्यात आल्या आहेत.

क्लिक करा आणि वाचा- ‘ठाकरे सरकारचे ‘घोटाळा इलेव्हन”; करीट सोमय्यांचे ‘या’ ११ नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप

आज संध्याकाळी ६ वाजेपर्यंतची स्थिती

२४ तासांत बाधित रुग्ण – ३३४
२४ तासात बरे झालेले रुग्ण – ३१०
बरे झालेले एकूण रुग्ण – ७२२३४९
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९७%
एकूण सक्रिय रुग्ण- ३०५६
रुग्ण दुपटीचा कालावधी- १५७७ दिवस
कोविड वाढीचा दर (२३ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट)- ०.०५ %

क्लिक करा आणि वाचा- योग्य वेळी सीडी लावणार, ती पोलिसांकडे दिली आहे; खडसे यांचा इशारा

Source link

corona updatescoronavirus in mumbaiCoronavirus latest updatescovid-19करोनाकरोना अपडेटकोविड-१९मुंबईतील करोनाची स्थिती
Comments (0)
Add Comment