पेरणेफाटा येथील विजयस्तंभास अभिवादन कार्यक्रमाचे अनुषंगाने विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी राज्यातील आणि राज्याबाहेरील मोठ्या प्रमाणात नागरीक येतात. त्यामुळे पुणे-अहमदनगर मार्गावरील पेरणे फाटा येथे गर्दीमुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी परिसरातील वाहतूकीत बदल करण्यात आला आहे. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांसाठी पार्किंगची सोय केली असून त्या ठिकाणाहून पीएमपीच्या बसची सोय करण्यात आली आहे.
असा असेल वाहतूक बदल
पुणे बाजूकडून अहमदनगर बाजूकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी, खराडी बायपास येथुन उजवीकडे वळण घेऊन मुंढवा चौक, मगरपट्टा चौक, डावीकडे वळण घेऊन पुणे सोलापूर महामार्गाने केडगाव चौफुला, न्हावरा, शिरुर मार्गे नगर रोड असे जावे. सोलापूर रस्त्यावरून आळंदी, चाकण या भागात जाणाऱ्या वाहन चालकांनी हडपसर, मगरपट्टा चौक, उजवीकडे वळण घेवून खराडी बायपासमार्गे विश्रांतवाडी येथून आळंदी व चाकण येथे जावे. मुंबई येथून अहमदनगर बाजूकडे जाणारी जड वाहतूक वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा मार्ग अहमदनगर अशी जातील.
मुंबई येथून अहमदनगर बाजूकडे जाणारी हलकी वाहने (कार, जीप) वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरुर मार्ग अहमदनगर अशी जातील. कोल्हापूर, सांगली, सातारा, कात्रज मार्गे मंतरवाडी फाटा, मगरपट्टा चौक येथून नगर कडे जाणाऱ्या वाहन चालकांनी हडपसर येथून पुणे सोलापूर महामार्गाने केडगाव चौफुला, न्हावरा, शिरूर मार्गे नगररोड असे जावे. विश्रांतवाडी लोहगाव मार्गे वाघोली व वाघोली लोहगाव मार्गे विश्रांतवाडीकडे जाणारी जड वाहतूक दोन दिवसात बंद राहील.
पुणे, आळंदी, थेऊर, केसनंद, अष्टापूर डोंगरगावच्या दिशने येणाऱ्यांसाठी पार्किंगची ठिकाणे-
आपले घर शेजारील पार्किग क्रमाकं एक (दुचाकी), पार्कींग क्रमांक दोन (चारचाकी), बौध्द वस्ती शेजारी पार्किंग तीन (चारचाकी), आपले घर सोसायटी मार्गील पार्किंग क्रमांक चार (बस व मोठी वाहने), मोनिका हॉटेल शेजारील पार्किंग क्रमांक पाच (दुचाकी), हॉटेल ओम साई लॉजच्या पाठीमागील पार्किंग क्रमांक सहा (चारचाकी), तुळापूर फाटा स्टफ कंपनी शेजारी पार्किंग क्रमांक सात (चारचाकी), तुळापूर फाटा राजशाही मिसळ हॉटेल मागे पार्किग क्रमांक आठ (दुचाकी)
थेऊर सोलापूरकडून येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंगची ठिकाणे-
सोमवंशी ऍकॅडमी समोर थेऊर रोड पार्किंग (चारचाकी), थेऊर रोड खंडोबालाचा माळ वेअर हाऊस शेजारी (चारचाकी), थेऊर रोड खंडोबा माळ पार्किंग (दुचाकी)
आळंदीकडून येणाऱ्या वाहनांसाठी पार्किंगची ठिकाणे-
तुळापूर रोडवरील वाय पॉईन्ट समोर पार्किंग क्रमांक नऊ (चारचाकी), हॉटेल शेतकरी मिसळ शेजारील पार्किंग क्रमांक १० (दुचाकी), रॉयल लॉजच्या शेजारी पार्किंग क्रमांक ११(दुचाकी), हॉटेल चिंचवन समोर पार्किंग क्रमांक १२ (चारचाकी), फुलगाव सैनिकी शाळा मैदान पार्किंग क्रमांक १३ (चारचाकी)