नागपूर: मिनीबसने दिलेल्या धडकेत एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे तिच्या सख्या मोठ्या बहिणीच्या डोळ्यादेखत तिचा मृत्यू झाला. श्रेया जीवन रोकडे (१८, रा. गणेशनगर, कोतवाली) असे मृत तरुणीचे नाव आहे. ही घटना इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोक चौक परिसरात गुरुवारी सकाळी नऊ वाजता घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रेया आणि तिची मोठी बहीण साक्षी ह्या त्यांच्या ॲक्टिव्हा गाडीने जात होत्या. साक्षी गाडी चालवित होती. चौकात सिग्नल लागला होता. त्यामुळे त्या सिग्नलवर उभ्या होत्या. यावेळी एमएच ४० वाय ६८७९ क्रमांच्या मिनीबसच्या आरोपी चालकाने त्यांना मागून धडक दिली. यात श्रेया आणि साक्षी दोघी खाली पडल्या. यात श्रेयाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दोघांना मेडिकलमध्ये भरती करण्यात आले. डॉक्टरांनी श्रेयाला तपासून मृत घोषित केले.

साक्षीलासुद्धा गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. श्रेया ही रायसोनी कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाला शिकत होती. साक्षी एका खासगी कंपनीत काम करीत असल्याचे कळते. त्यांचे चुलत भाऊ प्रतीक बंडुपंत रोकडे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर आरोपी चालकाने गाडी तेथेच सोडली व तेथून पळ काढला. पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेतली असून आरोपी चालकाचा शोध सुरू केला आहे.