आधी पार्थ पवारांना निवडून आणा, मग बाकी गप्पा; शरद पवार गटाच्या नेत्याचं अजितदादांना चॅलेंज

पुणे : सध्या महाराष्ट्रात शिरुर लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा सुरु आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुरचे विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आव्हान दिले आहे. त्यानंतर राज्याचे राजकारण कमालीचे तापले आहे. अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना आगामी लोकसभा निवडणुकीत शिरुरमध्ये पराभूत करून अजित पवार गटाचा उमेदवार निवडून आणणार असे आव्हान दिले आहे.

अजित पवारांनी हे आव्हान दिल्यानंतर शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी थेट अजित पवारांना त्यांचे पुत्र पार्थ पवार यांना निवडून आणून दाखवण्याचे ओपन चॅलेंज दिले आहे. अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना आव्हान देताना म्हटले होते की, मी स्वतः आणि दिलीप वळसे पाटील यांनी कष्ट केल्यामुळे अमोल कोल्हे विजयी झाले होते. अजित पवारांच्या या वक्तव्याला आता विकास लवांडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

कालपासून राष्ट्रवादी काँग्रेसचा ( शरद पवार गट ) शेतकरी आक्रोश मोर्चा सुरु झाला आहे. या मोर्चादरम्यान पुणे जिल्ह्यातील खेड येथे सभा पार पाडली यावेळी बोलताना विकास लवांडे म्हणाले की, “अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजून तुमचा उमेदवार फिक्स झाला नाही. अजित पवार उभा राहण्यासाठी याला त्याला काड्या करत आहेत. अजितदादा तुम्ही म्हणालात ना दिलीप वळसे पाटील यांनी कष्ट केले म्हणून अमोल कोल्हे विजयी झाले तर आता तुम्ही दिलीप वळसे पाटील यांना अमोल कोल्हे यांच्या विरोधात उभे करा, मग आपण पाहूच काय होतंय. असेल हिम्मत तर लढाच”.

अजितदादांचा कट्टर समर्थक ठाकरेंच्या भेटीला, मावळमध्ये शह बसणार? वाचा ग्राऊण्ड रिपोर्ट
इतकंच नाही तर अजित पवारांनी पार्थ पवार यांना पुन्हा मावळमध्ये उभा करावे आणि यावेळेस तरी निवडून आणून दाखवावे मग बाकीच्या गप्पा माराव्यात, असे थेट ओपन चॅलेंजच लवांडे यांनी अजित पवारांना दिले आहे.

अमोल कोल्हेंवर दादा ब्रिगेडचा हल्ला, काल गळ्यात गळे, आज आव्हानाची भाषा, अण्णांनी दंड थोपटले
तुमची दिल्लीत खूप वट आहे तर कांद्याचा प्रश्न सोडवून दाखवा, मल्ल साक्षी मलिक हिच्या डोळ्यातील अश्रू पुसायला त्या रुपाली चाकणकरला पाठवा ना, असं म्हणत लवांडे यांनी अजित पवारांना चांगलंच फैलावर घेतलं आहे. त्यामुळे आता पुण्यात अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात संघर्ष आणखीच टोकाला जाणार असल्याचे चित्र आहे.

अनेक गद्दार जन्माला येतात, पण मी साहेबांना सोडणार नाही, निष्ठा काय असते ते दाखवलं; जितेंद्र आव्हाडांचं विधान

Read Latest Maharashtra Updates And Marathi News

Source link

ajit pawarparth pawarSharad Pawarअजित पवारअमोल कोल्हेपार्थ पवारमावळ मतदारसंघविकास लवांडेशरद पवारशिरुर लोकसभा मतदारसंघ
Comments (0)
Add Comment