देशात राजस्थानची राजधानी जयपूर या गुन्ह्यांमध्ये आघाडीवर असून तेथे गेल्यावर्षी सर्वाधिक ७४१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे, तर ७६७ जणांचा मृत्यू झाला. ही सरासरी २४.१ आहे. देशात दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेशातील कानपूर आहे. कानपूरमध्ये ५७५ घटनांमध्ये ५७५ जणांचा मृत्यू झाला. सरासरी बघता ती १९.७ आहे.
-तरीही अज्ञाताविरुद्ध गुन्हा
कोंढाळी पोलिस स्टेशन हद्दीतील अमरावती मार्गावरील बाजारगाव येथील सोलर ग्रुपच्या इकॉनॉमिक एक्स्प्लोझिव्ह लिमिटेडच्या युनिटमध्ये दहा दिवसांपूर्वी स्फोट झाला. या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कोंढाळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध निष्काळजीपणे मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणात सर्वकाही ज्ञात असताना अज्ञात व्यक्तीविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सखोल तपासानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असा दावा एका अधिकाऱ्याने केला होता. याउलट एका श्रमिकाच्या मृत्यूप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी अथर्व कन्स्ट्रक्शनच्या सात बिल्डर व कत्रांटदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
आत्महत्येस प्रवृत्त करण्याचीही सरासरी अधिक
निष्काळपणे मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रमाणेच आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या घटनेच्या सरासरीतही नागपूर पुढे आहे. गेल्यावर्षी २८ जणांनी आत्महत्या केली. याप्रकरणात २८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही सरासरी १.१ आहे. या सरासरीत दुसऱ्या क्रमांकावर पुणे आहे. ५१ जणांच्या आत्महत्येप्रकरणात पोलिसांनी २६ गुन्हे दाखल केले. याची सरासरी ०.५ असून, मुंबईची सरासरी ०.३ आहे. राज्याच्या राजधानीत ५० घटनांमध्ये ५० जणांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.
वाडी पोलिसांचा हलगर्जीपणा
भावाच्या आजारपणाच्या वाढत्या खर्चामुळे तणावात असलेल्या ४६ वर्षीय पंकज गंगाप्रसाद डहरवाल (वय ४६, रा. वाडी) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी धंतोलीतील खासगी डॉक्टर व व्यवस्थापक पैशासाठी छळ करीत असल्याची चिठ्ठी त्यांनी पोलिस आयुक्तांच्या नावे लिहून ठेवली. ही चिठ्ठी वाडी पोलिसांनी जप्त केली. १३ डिसेंबरला पंकज यांनी जीवन संपविले. घटनेच्या १४ दिवसांनंतरही वाडी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला नाही. वाडी पोलिसांनी हे प्रकरण दडपल्याची चर्चा आहे.