श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनाला जाताय? नववर्षानिमित्त मंदिराच्या वेळेत मोठा बदल

बुलढाणा : नाताळाची सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागता निमित्त शेगावात श्रींच्या दर्शनासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता, श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे मंदिर ३१ डिसेंबर रोजी दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवणार येणार आहे, अशी माहिती श्री गजानन महाराज संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.

दरवर्षी नाताळच्या सुट्ट्या, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करण्याच्या निमित्ताने श्रींच्या दर्शनासाठी शेगावात मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. भाविकांना श्रींच्या समाधी दर्शनाचा लाभ मिळावा व होणाऱ्या गर्दीचे नियोजन योग्य रितीने व्हावे, या उद्देशाने ३१ डिसेंबर रोजी श्रींचे समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे.

थर्टी फर्स्टसाठी पहाटे ५ पर्यंत हॉटेल सुरु ठेवू द्या, शिंदे सरकारकडे असोसिएशनची मागणी
त्यामुळे रात्री येणाऱ्या भाविकांना पहाटे श्रींचे दर्शन, महाप्रसाद घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करता येणार आहे. श्रींच्या भाविकांसाठी संस्थानाच्या वतीने दर्शन बारी व श्रीमुख दर्शन बारी, महाप्रसाद पारायण मंडप, श्रींची गादी तसेच औदुंबर दर्शनाची व्यवस्था केली आहे. तसेच भक्तांच्या सोयीसाठी संस्थानाच्या भक्त निवासामध्ये नियमांनुसार अल्प दरात राहण्याची व्यवस्था नित्यप्रमाणे सुरू आहे.

तरुणीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी, आजीच्या सांभाळाची अट गैर, पोलीस प्रशासनाला मॅटचा दणका

संपूर्ण मंदिर परिसरात स्वच्छता

भक्तांची श्रींच्या प्रती आपली आस्था प्रसन्न मनाने एकरूप करणारी आहे. भक्तांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी श्रींचे सेवेकरी आपली सेवा देण्यास तत्पर आहेत.

पुण्यात तरुणीशी विवाह, येमेनचा युवक गुन्ह्यात अडकला, आता हायकोर्टाचे महत्त्वाचे आदेश

भाविकांची वाढती गर्दी पाहता घेतला निर्णय

दरवर्षी देशभरातील लाखो भाविक सरत्या वर्षाला निरोप देत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन नवीन वर्षाला सुरुवात करत असतात. त्यामुळे ३१ डिसेंबर रोजी लाखोच्या संख्येने भाविक शेगाव येथे दाखल होतात. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

संत गजानन महाराजांची ११३ वी पुण्यतिथी; संजीवन समाधी उत्सव ऋषीपंचमीचा योग, हजारो दिंड्या अन् लाखोंची गर्दी

Read Latest Maharashtra Updates And Marathi News

Source link

31st decemberbuldhana newsshegaonshri sant gajanan maharajबुलढाणा बातम्याशेगाव संत गजानन नगरीसंत गजानन महाराज मंदिर३१ डिसेंबर
Comments (0)
Add Comment