Samsung घेऊन येत आहे नवीन स्‍मार्टफोन! Galaxy M15 मध्ये असेल ६०००एमएएचची बॅटरी

Samsung एक नवीन स्‍मार्टफोन Galaxy M15 च्या लाँचची तयारी करत आहे. असा दावा एका रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. त्यानुसार हा फोन Galaxy A15 चा रीब्रँडेड व्हर्जन बनून बाजारात येऊ शकतो. Galaxy M15 मधील प्रमुख फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची कंफर्म माहिती मिळाली नाही. पंरतु फोनमध्ये पावरफुल बॅटरी असेल, अशी चर्चा आहे. सॅमसंग Galaxy M15 संबंधित संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे.

GalaxyClub नं दिलेल्या माहितीनुसार सॅममाेबाइलच्या रिपोर्टमध्ये लिहिण्यात आलं आहे की Galaxy M15 मध्ये ६,०००एमएएचची बॅटरी असेल, जी गॅलेक्सी ए१५ पेक्षा जास्त १,०००एमएएचनं जास्त आहे. प्रोसेसर कोणता दिला जाईल, याची माहिती अद्याप समोर आली नाही. Galaxy A15 मध्ये मीडियाटेकचा डायमेन्सिटी ६१०० प्लस प्रोसेसरचा वापर करण्यात आला होता. त्याच्या तुलनेत Galaxy M15 मध्ये जास्त शक्तिशाली प्रोसेसर दिला जाऊ शकतो.

विशेष म्हणजे Galaxy A15 स्मार्टफोन भारतात दोन रॅम आणि स्‍टोरेज ऑप्‍शन मध्ये आला आहे. ह्या फोनच्या ८जीबी + १२८जीबी मॉडेलची किंमत १९,४९९ रुपये आहे. तर, ८जीबी + २५६जीबी व्हेरिएंट २२,४९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हा फोन ब्‍लू ब्लॅक, ब्‍लू आणि लाइट ब्‍लू कलर ऑप्‍शन मध्ये येतो.

Galaxy A15 5G मध्ये ६.५ इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्‍प्‍ले आहे, ज्यात ड्यूड्रॉप नॉच आहे. डिस्‍प्‍लेमध्ये फुल एचडी प्‍लस रेजॉलूशन मिळते आणि हा ९० हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. याची पीक ब्राइटनेस ८०० निट्स आहे. Galaxy A15 5G स्‍मार्टफोनमध्ये मीडियाटेकच्या डायमेन्सिटी ६१०० प्‍लस प्रोसेसरची शक्ती आहे. हा अँड्रॉइड १४ ओएसवर चालतो, ज्यावर वन युआय ६ सॉफ्टवेयरची लेयर आहे.

Galaxy A15 5G मध्ये ५० मेगापिक्‍सलचा मेन रियर कॅमेरा आहे. सोबत ५ मेगापिक्‍सलची अल्‍ट्रा वाइड लेन्स आणि ५ मेगापिक्‍सलचा मॅक्रो शूटर देण्यात आला आहे. म्हणजे हा एक ट्रिपल रियर कॅमेरा फोन आहे. फ्रंटला १३ मेगापिक्‍सलचा सेल्‍फी कॅमेरा आहे. Galaxy A15 5G मध्ये ५००० एमएएचची बॅटरी आहे, जी २५ वॉट चार्जिंगला सपोर्ट करते.

Source link

galaxy m15galaxy m15 launchgalaxy m15 pricesamsungsamsung galaxy m15
Comments (0)
Add Comment