मराठा समाजाने गट-तट ठेवू नयेत. सर्वांनी एकत्र यावे हा गोरगरीब मराठ्यांच्या पोरांच्या भविष्याचा विषय आहे असे जरांगे पाटील म्हणाले. मराठा आंदोलकांना मोठ्या संख्येने मैदानांची आवश्यकता भासणार आहे त्यासाठी सर्वजण तयारी करत आहोत असे जरांगे यांनी सांगितले तसेच कोणत्याही परिस्थितीत मुंबईतील आंदोलनाचा निर्णय रद्द करणार नाही असे जरांगे यांनी स्पष्ट केले.
तीन कोटी मराठे मुंबईत धडकणार
मुंबईत तीन कोटींहून अधिक मराठा आंदोलक येतील, असा विश्वास मनोज जरांगेंनी व्यक्त केला. मुंबईचा दौरा रद्द होणारच नाही. २० जानेवारीपर्यंत मुंबईच्या दिशेने मोर्चा निघणार आहे. मोठ्या संख्येने मराठा समाज मुंबईला येणार असून मुंबईतील सर्व मैदाने आम्हाला लागणार आहेत. त्यामुळे आाता सरकारची जबाबदारी आहेत त्यांनी आम्हाला मैदाने द्यावीत अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.
वाहने अडविल्यास फडणवीसांच्या दारात बसणार
२० तारखेला मोठ्या प्रमाणात मराठे मुंबईत येणार असून जर सरकारने आमची वाहने अडवली तर आम्ही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दारात बसू असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. आमची वाहने अडवली तर आम्ही आमचे सामान कशात नेणार. आम्हाला मुंबईत राहण्यासाठी निवारा, दैनंदिन जीवनाच्या गोष्टी लागणार आहेत त्यासाठी आम्ही ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन मुंबईत येणार आहोत. आम्ही त्यात दगड भरुन आणणार नाही. त्यामुळे सरकार आपल्यावर कारवाई करेल. ापली वाहने जप्त करेल याविषयी मराठ्यांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन मनोज जरांगे यांनी केले आहे.