मविआच्या जागावाटपावरुन दावे प्रतिदावे सुरुच; राऊतांच्या वक्तव्याला काँग्रेस नेत्यांचा विरोध

म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी जागावाटपावरुन काँग्रेसला शून्यातून सुरुवात करण्याचा सल्ला दिल्यानंतर काँग्रेसने याविरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांच्यासह इतर अनेक नेत्यांनी विरोध केला असून महाराष्ट्राच्या विधानसभेत काँग्रेस सर्वात मोठा विरोधी पक्ष असून त्याचे नेतृत्त्व करीत असल्याचा टोला देवरा यांनी एक्सवरुन लगाविला. तर त्याचवेळी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनीही याविरोधात २०१९ संदर्भ आता चालणार नसल्याचा इशारा संजय राऊत यांना दिला आहे.

संजय राऊत यांच्या मतानुसार, ४० आमदार पक्ष सोडून गेल्यानंतरही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यांच्या सल्ल्यानुसार काँग्रेसने मी श्री संजय राऊत यांना सांगू इच्छितो की, कोणतेही जागावाटप हे महाराष्ट्राच्या स्थानिक नेतृत्वाला विश्वासात घेतल्या शिवाय पुढे जाऊ शकत नाही. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी या मताशी सहमत आहे, असे मिलिंद देवरा यांनी म्हटले आहे.

ठाकरेंकडे मतं किती सांगणं कठीण: संजय निरुपम

संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर संजय निरुपम यांनीही नाराजी व्यक्त केली. ‘गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात जे काही घडले ते दुर्भाग्यपूर्ण आहेत. शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. त्यामुळे शिवसेनेकडे नेमकी किती मते आहेत. हे सांगणे कठीण आहे. असे असतानाच जागेबाबत दावा करणे चुकीचे असल्याचे आहे,’ असे संजय निरुपम यांनी म्हटले.

म. टा. प्रतिनिधी यांच्याविषयी

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

Congressloksabha election 2024milind deoraSanjay NirupamSanjay Rautमहाविकास आघाडीलोकसभा निवडणूकसंजय निरुपमसंजय राऊत
Comments (0)
Add Comment