पुणे: पुण्यातील कात्रज भुयारी मार्गावर एक विचित्र अपघात घडला आहे. एका पाठोपाठ एक अशा सहा गाड्या एकमेकांना धडकल्याची घटना आज दुपारी घडली आहे. यामध्ये एक महिला जखमी झाली आहे. तर या अपघातात एका एसटी बसचा ही समावेश आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलीस दाखल झाले असून अपघाताची माहिती घेतली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारामार्गे पुण्यात येणाऱ्या मुख्य रस्ता असणाऱ्या कात्रज भुयारी मार्गावर नेहेमीच वर्दळ असते. कधी कधी मोठी वाहतूक कोंडी देखील त्या भुयारी मार्गावर होत असते. मात्र आज दुपारी पुण्याकडे येणाऱ्या सहा गाड्या एका पाठोपाठ धडकल्या. पुढे असलेली सुमो गाडीने अचानक ब्रेक मारल्याने हा अपघात झाला आहे. मात्र सुमो गाडी पुढे असलेल्या दुचाकीस्वाराने अचानक गाडी पुढे कट मारल्यामुळे सुमो गाडीचा चालकाच नियंत्रण सुटू नये म्हणून गाडीचा ब्रेक मारला. परंतु मागून सेम लेनने येणाऱ्या गाड्या एकमेकांना धडकल्या.

अपघातानंतर घटनास्थळी मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यानंतर घटनास्थळी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या पोलीस दाखल झाले असून त्यानी सर्व प्रथम क्रेनच्या सहाय्याने अपघात झालेल्या गाड्या बाजूला काढल्या. वाहतूक सुरळीत करून दिली. जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील पंचनामा आणि कारवाईचे काम सुरू आहे.