या भरतीद्वारे प्रादेशिक अधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, वैज्ञानिक अधिकारी, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, प्रमुख लेखापाल, विधी सहायक अशा अनेक संवर्गातील एकूण ६४ रिक्त पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून १९ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता, वेतन याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मुंबई भरती २०२४’ मधील पदे आणि पदसंख्या –
प्रादेशिक अधिकारी – ०२ जागा
वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी – ०१ जागा
वैज्ञानिक अधिकारी – ०२ जागा
कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी – ०४ जागा
प्रमुख लेखापाल – ०३ जागा
विधी सहायक – ०३ जागा
कनिष्ठ लघुलेखक – १४ जागा
कनिष्ठ वैज्ञानिक सहायक – १६ जागा
वरिष्ठ लिपिक – १० जागा
प्रयोगशाळा सहायक – ०३ जागा
कनिष्ठ लिपिक/टंकलेखक – ०६ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ६४ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार संबधित विषयात पदवीधर/ पदव्युत्तर पदवी प्राप्त असावा. पदनिहाय विस्तृत पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.
वेतनश्रेणी –
प्रादेशिक अधिकारी – ६७ हजार ७०० ते २ लाख ८ हजार ७००
वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी – ६७ हजार ७०० ते २ लाख ८ हजार ७००
वैज्ञानिक अधिकारी – ५५ हजार १०० १ लाख ७५ हजार १००
कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी – ४१ हजार ८०० ते १ लाख ३२ हजार ३००
प्रमुख लेखापाल – ३८ हजार ६०० ते १ लाख २२ हजार ८००
विधी सहायक – ३८ हजार ६०० ते १ लाख २२ हजार ८००
कनिष्ठ लघुलेखक – ३८ हजार ६०० ते १ लाख २२ हजार ८००
कनिष्ठ वैज्ञानिक सहायक – ३५ हजार ४०० ते १ लाख १२ हजार ४००
वरिष्ठ लिपिक – २५ हजार ५०० ते ८१ हजार १००
प्रयोगशाळा सहायक – २१ हजार ७०० ते ६९ हजार १००
कनिष्ठ लिपिक/टंक लेखक – १९ हजार ९०० ते ६३ हजार २००
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ जानेवारी २०२४
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ‘ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच १९ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे.