रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण भागात असलेल्या चिंचगरिया गावातील नदी किनारी असलेली ओसाड जमीन या शेतकऱ्यांने फुलवली आहे. गेले जवळपास दहा ते पंधरा वर्षे हा यशस्वी प्रयोग हा शेतकरी करत आहे. या भाजीपाला लागवडीला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ठिबक सिंचनाची जोड दिली आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यही टळला आहे. पावसानंतर काकडी, वांगी, कलिंगड, भेंडी आदी भाजीपाला पिकांची लागवड करून अहोरात्र मेहनत करून नदी जवळ असलेली ही जागा या शेतकऱ्याने फुलवली आहे. हा भाजीपाला स्थानिक बाजारपेठेतच येथील व्यापारी येऊन घेऊन जातात. त्यामुळे वाहतूक खर्चही वाचतो. सात ते आठ जणांना दरवर्षी रोजगार उपलब्ध होतो. लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवून आदर्श घालून दिला आहे.
कोकणातील अनेक शेतीच्या ओसाड जागा लागवडीखाली आणून बेरोजगार युवकांनी एकत्र येत भाजीपाला लागवड केल्यास कोकणात रत्नागिरी जिल्हाही भाजीपाला लागवडीत स्वयंपूर्ण होईल पश्चिम महाराष्ट्रातून आयात कराव्या लागणाऱ्या भाजीपालावर अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या चिंचघर गावातील संग्राम कदम यांनी संजय पायरे या शेतकर्याला आपली पडीक जमीन भाजीपाला लागवड उत्पादनासाठी मोफत वापरण्यास दिली आहे. तब्बल दहा ते पंधरा एकरमध्ये वांगी, काकडी, भेंडी आधी भाजीपाला केला जातो.
या भाजीपाल्याच्या मळ्यातून दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळतं. मेहनत करण्याची तयारी आणि जिद्द ओळखल्यास कोकणातील पडीक जमिनी या भाजीपाला लागवडीखाली आणता येतील, अशी माहिती शेतकरी संजय पायरे यांनी दिली आहे. नदी किनाऱ्यावर असलेली जवळपास दहा ते पंधरा एकर जमीन भाजीपाला लागवडीखाली आणून मोठे उत्पन्न हे शेतकरी कुटुंब दरवर्षी घेत आहे. तसेच यामुळे या परिसरातील सात ते आठ जणांना या भाजीपाल्याचे मळ्यात रोजगारही उपलब्ध होतो. उत्पादित केलेला भाजीपाला हा आपल्या मळ्यात येऊन येथे स्थानिक व्यापारी घेऊन जातात. त्यामुळे वाहतुकीचा ही प्रश्न येत नाही. त्यामुळे ग्राहकांनाही ताजी भाजी स्थानिक पातळीवर उपलब्ध होते.