मुंबई: बिल्डर शैलेश सावला आणि त्यांच्या पत्नी जयश्री सावल यांच्याशी संबंधित ६.९३ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) टाच आणली आहे. जुहू ताज झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसंबंधीच्या घोटाळ्यात ही कारवाई करण्यात आली आहे.
याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभागाने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ‘ईडी’ने तपास सुरू केला आहे. त्यानुसार शैलेश सावला यांची मेसर्स कुणाल बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स ही कंपनी आहे. या कंपनीने संबंधित झोपू योजनेत झोपडपट्टीशी संबंध नसलेल्यांना बनावट दस्तावेजांच्या आधारे गाळे आणि दुकानांची विक्री केली.

त्याखेरीज मेसर्स चिंत लाइफस्पेसेस एलएलपी या कंपनीची देखील याच योजनेत मोफत जागा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली. या माध्यमातून सावला यांनी राज्य सरकार आणि या संबंधित कंपनीची ११२.५० कोटी रुपयांना फसवणूक केली. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी निगडित मालमत्तेवर टाच आणली गेली आहे. या प्रकरणी याआधी देखील ईडीने सावला यांच्या ४५.४३ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे.