नाशिककरांनी मुहूर्त साधला, सोने खरेदीचा विक्रम मोडला; एका दिवसात सुवर्णकारांची ५० कोटींची कमाई

नाशिक: गुरुपुष्यअमृतानिमित्त गुरुवारी संपूर्ण शहरातील सराफ दुकानात गर्दी झाली होती. शहरातील सराफ व्यावसायिकांच्या सांगण्यानुसार शहरातील सोन्याच्या बाजारात या शुभ मुहूर्तावर ५० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा व्यवसाय झाला आहे. नेहमीच्या दिवशी, शहरातील सोन्याच्या बाजारात दररोज सुमारे १५-२० कोटी रुपयांची उलाढाल सुरू आहे. काल गुरुपुष्यअमृत योग आल्याने सराफ बाजारात मोठी उलाढाल झाली.

सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांकडून कमी प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. सोन्याच्या वेढा चोख आणि सोन्याच्या नाण्यांसाठी तसेच गोल्ड बिस्कीट यासारख्या वस्तूंची मागणी कमी झाली आहे. त्याउलट सोन्याचे दागिने, कानातले, अंगठी, ब्रेसलेट, चैन, कर्णकुंडल यासारख्या वस्तूंची चांगली मागणी आहे. लग्नाचा हंगाम सुरू झाला असल्याने लग्नाच्या खरेदीसाठी लोकांची गर्दी झाली आहे. लग्नकार्यासाठी दाग दागिने बनविण्यासाठी ग्राहकांमध्ये उत्सुकता असते.
सोन्याच्या खरेदीसाठी गुरुपुष्यअमृत योग आल्याने लग्नाच्या हंगामाची देखील खरेदी मोठ्या प्रमाणात केली गेली. अंगठी, मंगळसूत्र, चैन, यांना देखील मोठ्या प्रमाणात मागणी होती.

दरम्यान, गुढीपाडवा, अक्षय्य तृतीया, दसरा आणि दिवाळी व्यतिरिक्त जेव्हा लोक सोन्याचे दागिने खरेदी करण्यास प्राधान्य देतात तेव्हा गुरुपुष्यामृत हा एक शुभ प्रसंग आहे. या प्रसंगी काल नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात सोने चांदीच्या खरेदीत वाढ झाल्याने मोठी उलाढाल झाली आहे. सराफ व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये गुरुवारी सोन्याचा भाव ६३,९०० रुपये प्रति १० ग्रॅम (जीएसटी वगळून) होता, तर चांदीचा भाव ७६,००० रुपये प्रति किलो होता. शहरात ५,००० पेक्षा जास्त लहान आणि मोठ्या ज्वेलरी शोरूम आहेत. प्रमुख ज्वेलरी मार्केट, सराफ बाजार येथे सुमारे २५० दुकानं आहेत.

क्षणात कोट्यवधींची मालकीण झाली, पण श्रीमंती टिकवता आली नाही, एक चूक अन् तिने सारं गमावलं
Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

gold newsgold price todaygold rate at my placegold rate todaygurupushyaamrita muhurtnashik 50 crore rupees gold sellingnashik news today
Comments (0)
Add Comment