लाखाची लाच घेताना तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात; शिपायावर देखील कारवाई

हायलाइट्स:

  • लाच घेणाऱ्या कल्याणच्या तहसीलदाराला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले.
  • जमिनीबाबतच्या हरकतीवरील सुनावणीचे निकालपत्र देण्यासाठी मागितली लाच
  • या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

म. टा. प्रतिनिधी, ठाणे

जमिनीबाबतच्या हरकतीवरील सुनावणीचे निकालपत्र देण्यासाठी लाच घेणाऱ्या कल्याणच्या तहसीलदारासह शिपायाला सोमवारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात पकडले. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (thane anti curruption bureau takes action against the tehsildar of kalyan)

तक्रारदाराच्या बांधकाम कंपनीने कल्याण तालुक्यातील वरप येथे जमीन घेतली असून या जमिनीबाबतच्या हरकतीवरील सुनावणीचे निकालपत्र देण्यासाठी कल्याणचे तहसिलदार दिपक आकडे यांनी स्वत:साठी एक लाखांची लाच मागितली. तसेच लाचेची रक्कम कार्यालयातील शिपाई बाबू उर्फ मनोहर हरड यांच्याकडे देण्यास सांगितले. हरड यांनीही स्वत:साठी आणि कर्मचाऱ्यांसाठी २० हजारांची लाच मागितली होती. याबाबत २५ ऑगस्ट रोजी तक्रारदाराने एसीबीकडे दिलेल्या तक्रारीनंतर लाचेबाबत एसीबीने पडताळणी केली.

क्लिक करा आणि वाचा- धक्कादायक! अनधिकृत फेरीवाल्याचा पालिका सहाय्यक आयुक्तांवर चाकूने हल्ला, दोन बोटे तुटली

लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर एसीबीने सोमवारी कल्याण तहसिलदार कार्यालयात लावलेल्या सापळ्यात आकडे आणि हरड अडकले. तक्रारदार यांच्याकडून आकडे यांच्यासाठी एक लाख आणि हरड यांनी स्वत:साठी २० हजार असे एकूण १ लाख २० हजारांची लाच घेताना आकडे आणि हरड यांना रंगेहात पकडण्यात आले.

क्लिक करा आणि वाचा- करोना: मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्येत किंचित घट, मात्र ही चिंता कायम!
क्लिक करा आणि वाचा- ‘ठाकरे सरकारचे ‘घोटाळा इलेव्हन”; करीट सोमय्यांचे ‘या’ ११ नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप

Source link

acbaction against tehsildarkalyanthane anti curruption bureauतहसिलदार एसीबीच्या जाळ्यातशिपायावर देखील कारवाई
Comments (0)
Add Comment