महात्मा गांधी रोड, लष्कर (कॅम्प) परिसरातील वाहतूक बदल
– वाय जंक्शनवरून महात्मा गांधी रस्त्याकडे येणारी वाहतूक १५ ऑगस्ट चौक येथे बंद करून ती कुरेशी मस्जिद व सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे.
– इस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार आहे.
– व्होल्गा चौकाकडून महंमद रफी चौकाकडे जाणारी वाहतूक बंद केली जाईल. ही वाहतूक सरळ ईस्ट स्ट्रीट रोडने इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येईल.
– इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून, ती वाहतूक इंदिरा गांधी चौकातून लष्कर पोलिस ठाणे चौकाकडे वळविण्यात येईल.
– सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात येणार असून, ही वाहतूक ताबूत स्ट्रीट मार्गे पुढे सोडण्यात येईल.
गोपाळ कृष्ण गोखले रोड व जंगली महाराज रोड वाहतूक बदल
– गोपाळ कृष्ण गोखले (फर्ग्युसन) रोड कोथरूड / कर्वेरोडकडुन येणारी वाहतूक खंडोजीबाबा चौक या ठिकाणी बंद करुन लॉ कॉलेज रोड, प्रभात रोड व लोकमान्य टिळक चौकमार्गे (अलका डॉकीज चौक) वळविली जाणार
– जंगली महाराज रोडने खंडोजीबाबा चौक, गुडलक चौक व इतर गल्ल्यांमधून गोपाळ कृष्ण गोखले रोडकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेप्रमाणे झाशी राणी चौक या ठिकाणी बंद करून पुणे महानगरपालिका, ओंकारेश्वर मंदिर व शिवाजी रोड मार्गे वळविण्यात येईल.
हा परिसर राहील नो-व्हेईकल झोन (३१ डिसेंबरच्या रात्री सात ते एक जानेवारीच्या पहाटे पाच पर्यंत)
– गोपाळ कृष्ण गोखले रस्ता : गुडलक चौक ते फर्ग्युसन कॉलेज मुख्य प्रवेशद्वारापर्यंत.
– महात्मा गांधी रस्ता : १५ ऑगस्ट चौक ते हॉटेल अरोरा टॉवर
‘ड्रंक अॅँड ड्राइव्ह’ची होणार कारवाई
सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागताच्या वेळी मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली आहे. ‘ड्रंक अॅँड ड्राइव्ह’ कारवाई करताना ब्लो पाइप (प्लास्टिक पाईप) हे करोना संसर्गाचा विचार करुन एका व्यक्तिसाठी एक पाइप वापरण्यात येणार आहे. प्रशासनाकडून साथीच्या रोगापासून बचाव करण्याची योग्य दक्षता घेण्यात येत आहे. तरी नागरिकांनी मद्य प्राशन करून वाहन चालवू नये, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.