मिळालेली अधिक माहिती अशी की, कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील भादवण या गावात मृत आशाताई मारूती खुळे (वय ४२ वर्ष) ही महिला आपल्या पतीचे निधन झाल्याने आई सोबत राहत होती. गुरुवारी (दि २८) रोजी संशयित आरोपी योगेश पांडूरंग पाटील (वय ३५ रा. भादवण) याने दुपारच्या सुमारास भादवण ते भादवणवाडी रस्त्यावर सदर महिलेले गाठले आणि बाजूला असलेल्या उसाच्या फडात सदर महिलेला ओढत घेऊन गेला. यावेळी योगेश याने सदर महिलेला बळजबरी करत शरीर सुखाची मागणी केली. मात्र, त्यावेळी आशाताईने त्याला विरोध केल्याने संशयित आरोपी योगेशने रागाच्या भरात तिचा गळा आवळून खून केला.
मृतदेह जाळण्याचा प्रयत्न
दरम्यान, ही घटना कोणाला कळू नये यासाठी सदरमहिलेचा मृतदेह उसाच्या फडात टाकला आणि उसाचा फड पेटवून लावत मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, सायंकाळी उसाला आग लागल्याचे कळताच गावकऱ्यांनी ते विजवण्यासाठी धाव घेतली. आग शांत झाल्यानंतर शेतात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने गावकऱ्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तपास सुरू केला आणि रात्री उशीरा सदर महिलेची ओळख पटली.
सीसीटीव्ही कॅमेरामुळे गुन्हा उघड
मात्र, जळालेल्या उसात ही महिला कशी गेली. याबाबत संशय व्यक्त करत घातपाताच्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला असता गुरूवारी दुपारच्या सुमारास संशयित पाटील हा भादवणवाडी मार्गावर जाताना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसला. शिवाय, श्वान पथकही त्याच्याच घरात गेल्याने पोलिसांचा संशय त्याच्यावर अधिक बळावला. तर पोलिसांनी संशयित आरोपी योगेश पाटील याला शुक्रवारी सकाळी ताब्यात घेत चौकशी केली असता शरीरसुखासाठी नकार दिल्याने खून केल्याची कबुली त्याने दिली. संशयित आरोपी योगेश पांडूरंग पाटील हा विवाहित असून त्याला दोन मुली आहेत. दरम्यान, आता त्याच्यावर आजरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News