वाचा: …म्हणून करोनाच्या लाटा आणल्या जाताहेत; राज ठाकरेंचा गंभीर आरोप
दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. करोना संसर्ग फैलावू नये म्हणून दहीहंडी साजरी करण्यास राज्य सरकारनं मनाई केली होती. मात्र, हे मनाई आदेश झुगारून मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई, ठाण्यात दहीहंडी फोडली. पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. ‘राज्यात सगळं काही सुरळीत सुरू आहे. यात्रा निघाताहेत, मेळावे होताहेत. बिल्डर कामं करून घेण्यासाठी सरकारच्या लोकांना भेटताहेत. त्यातून करोना पसरत नाही, पण सण-उत्सव आले की करोना पसरतो. हे सगळं जाणीवपूर्वक केलं जात आहे. सगळे सण साजरे झालेच पाहिजेत. सरकारला नियम लावायचेच असतील तर सगळ्यांसाठी एकच नियम लावावा. एकाला एक नियम आणि दुसऱ्याला एक नियम असं चालणार नाही,’ असं राज ठाकरे म्हणाले.
वाचा: जन आशीर्वाद यात्रेला लॉकडाऊन का नाही?; राज ठाकरेंचा सवाल
मंदिरांच्या मुद्द्यावरूनही राज ठाकरे यांनी सरकारला सुनावलं. ‘मंदिरं उघडली गेलीच पाहिजेत. आजचा दिवस जाऊ द्या. नंतर मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांची बैठका घेणार आहे. त्यात आम्ही याबाबत चर्चा करूच. सगळी मंदिरं उघडलीच पाहिजेत नाहीतर सगळ्या मंदिरांच्या बाहेर घंटानाद करू,’ असा इशाराच त्यांनी दिला. घराबाहेर पडायला ह्या लोकांची फाटते, त्यात आमचा काय दोष?,’ असा सवालही राज यांनी केला.
वाचा: जळगाव जिल्ह्यात पुराचे संकट; नद्या तुडुंब, गावांचा संपर्क तुटला