‘माझी ओळख’, ‘काम, समर्पण आणि निष्ठा’; ठाण्यात झळकले निष्ठेचे होर्डिंग

ठाणे : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात जागोजागी निष्ठेचे होर्डिंग झळकले आहे. आगामी वर्ष निवडणुकांचे असल्याचे बॅनरमध्ये नमूद करत नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या बॅनरवर मविआ नेत्यांचे फोटो झळकले असून शुभेच्छुक म्हणून कोणत्याही व्यक्ती अथवा नेत्याचे नाव नमूद न करता ‘माझी ओळख’ या वाक्याखाली ‘काम, समर्पण आणि निष्ठा’ असा उल्लेख केला आहे. माञ या निनावी बॅनरची शहरात जोरदार चर्चा सुरु आहे.

ठाण्यात नेहमीच अशा विविध पध्दतीच्या बॅनरची चर्चा रंगते

याआधीही शहरात निनावी बॅनर लागल्यानंतर उलटसुलट राजकीय चर्चा रंगतात. शुक्रवार राञीपासून ठाण्यातील नागरिकांचे लक्ष वेधले आहे. येणारे वर्ष हे निवडणुकांचे वर्ष आहे. नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा अशी पोस्टरबाजी या बॅनरद्वारे करण्यात आली आहे. या बॅनरवर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो झळकले आहेत.

महाराष्ट्रातला आणखी एक प्रकल्प गुजरातला, देशातील पहिले पाणबुडी पर्यटन सिंधुदुर्गातून हलणार
शुभेच्छुकाने लक्ष वेधले

शुभेच्छुक म्हणून बॅनरवर काम, समर्पण आणि निष्ठा असा उल्लेख असल्याने बॅनरद्वारे नेमका कोणाला टोला हाणला, अशीही चर्चा सुरु आहे.

प्रमुख चौकात बॅनरबाजी

ठाण्यातील हरीनिवास, खोपट जांभळी नाका, नितीन कंपनी, कळवा या भागात महत्वाच्या चौकाचौकात या आशयाचे बॅनर लागले आहेत.

पुण्याची बस ताम्हिणी घाटात उलटली, भीषण अपघातात ५५ जण जखमी, दोघांचा मृत्यू

Source link

thane marathi newsthane political bannersthane shiv senaठाणे मराठी बातम्याठाणे राजकीय होर्डिंगठाणे शिवसेना
Comments (0)
Add Comment