सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत ‘या’ पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

Sangli District Central Co operative Bank Recruitment 2024: तुम्ही बँकिंग क्षेत्रात असाल आणि चांगल्या संधीची वाट पाहत असाल तर सांगली येथे उत्तम नोकरी चालून आली आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीद्वारे ‘सरव्यवस्थापक’ पदांच्या एकूण ०३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

नुकतीच याबाबत बँकेने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून १५ जानेवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरती प्रक्रियेतील पदे, पात्रता याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड भरती २०२४’ मधील पदे आणि पदसंख्या –
सरव्यवस्थापक – ०३ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०३ जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार पदवी किंवा पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा. जी.डी.सी. अँड ए. / जे.ए.आय.आय.बी. / सी.ए.आय.आय.बी असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

नोकरी ठिकाण – सांगली

वयोमर्यादा
– कमाल वय ६० वर्षे

अर्ज पद्धती – ऑफलाइन

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. अध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सांगली, मुख्य कार्यालय, पद्मभूषण वसंतदादा पाटील मार्ग, कर्मवीर भाऊराव पाटील चौक, सांगली-४१६ ४१६

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ जानेवारी २०२४

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात प्रसिद्ध झालेली अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑफलाइन म्हणजेच पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच १५ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे.

Source link

bank jobs 2024recruitmentSangli DCC Bank Recruitment 2024Sangli District Central Co operative Bank Ltd jobsसांगली जिल्हा बँक भरती २०२४सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक
Comments (0)
Add Comment