मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांची अन्वेषण स्पर्धेत दर्जेदार कामगिरी; पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय संशोधन महोत्सव


University Of Mumbai : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे दिनांक २८ ते २९ डिसेंबर २०२३ दरम्यान आयोजित केलेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय संशोधन महोत्सवात (अन्वेषण) मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी दर्जेदार कामगिरी केली आहे. संशोधक विद्यार्थ्यांनी एक सुवर्ण पदक आणि दोन रौप्य पदकांची कमाई करत विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. कृषी अभ्यास गटात ओम यादव या विद्यार्थ्यास सुवर्ण पदक, तर मानस महाले या विद्यार्थ्यांस वैद्यक शास्त्र व औषधशास्त्र या गटात रौप्य आणि गौरव पांडेय या विद्यार्थ्यास मानव्यविद्या गटासाठी रौप्य पदक मिळाले आहे.

Source link

mu newsmumbai universitymumbai university achievementuniversity of mumbaiमुंबई विद्यापीठमुंबई विद्यापीठ बातम्या
Comments (0)
Add Comment