खोटी शपथ घेतल्याने माजी सरपंचाला मारहाण? ग्रामपंचायत सदस्यासह आठ जणांवर गुन्हा

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : हिंजवडीचे माजी सरपंच आणि ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य विशाल साखरे यांना गुरुवारी ग्रामपंचायत कार्यालयात घुसून बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी ग्रामपंचायत सदस्य मयूर साखरे यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडलं?

विशाल लक्ष्मण साखरे (४४, रा. हिंजवडी) असे मारहाण करण्यात आलेल्या माजी सरपंचाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ग्रामपंचायत सदस्य मयूर राजेंद्र साखरे, सूरज शिवाजी साखरे, राम नारायण साखरे, सुमीत पांडुरंग साखरे, रोहित कृष्णा जांभूळकर (सर्व रा. हिंजवडी) आणि ओंकार रामदास मेमाणे (रा. मारुंजी) यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पौळ यांनी सांगितले, ‘हिंजवडी ग्रामपंचायतची मासिक सभा सुरू असताना सभेच्या विषयपत्रिकेवर ग्रामपंचायत व्यायाम शाळा हस्तांतराबाबतचा मुद्दा चर्चेसाठी आला. ही व्यायामशाळा मयूर साखरे याचा भाऊ चालवतो. त्यामुळे व्यायामशाळा ग्रामपंचायतीकडे हस्तांतर करण्यास त्याचा विरोध होता. या कारणावरून मयूर याने विशाल साखरे यांना शिवीगाळ केली आणि धमकी देऊन तो सभेतून बाहेर निघून गेला.

काही वेळाने मयूर साथीदारांसह ग्रामपंचायत कार्यालयात घुसला. विशाल यांना शिवीगाळ, दमदाटी करून बेदम मारहाण केली. इतर ग्रामपंचायत सदस्यांनी मध्यस्थी करून भांडण सोडवले.
घरखर्चाच्या पैशावरुन वाद, पत्नीने बोचकारले पतीचे नाक, नंतर रागाच्या भरात भयंकर कृत्य, काय घडलं?
खोटी शपथ घेतल्याचा राग?

सरपंचपदाच्या निवडणुकीवेळी विशाल साखरे यांनी आरोपी मयूर साखरे याला मतदान करण्याची शपथ हिंजवडीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे आराध्य दैवत असलेल्या म्हातोबा महाराजांसमोर घेतली होती. प्रत्यक्षात मयूर साखरेविरोधात मतदान केले. या वादातूनच ही मारहाण केल्याची चर्चा परिसरात आहे.

Source link

gram panchayathinjwadi police stationhinjwadi punePimpri Chinchwad gram panchayatpimpri chinchwad newsPune news
Comments (0)
Add Comment