जयंत पाटील आणि आमच्यामध्ये काल चर्चा झालेली आहे. वंचित बहुजन आघाडी म्हणजेच प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाशी आमची युती झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रकाश आंबेडकर यांना आपल्यासोबत घेण्याची भूमिका घेतलेली आहे. राज्यातील काँग्रेस नेत्यांचं देखील हेच मत आहे, असं संजय राऊत म्हणाले.
जिंकण्याचं मेरिट ज्या मतदारसंघात ज्या पक्षाकडे आहे. त्यांना मतदारसंघ सोडला जाईल. हाच निकष महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी लागू असेल, असं संजय राऊत म्हणाले. जिंकेल त्याची जागा हे महाराष्ट्रात मविआचं नाहीतर देशात इंडिया आघाडीचं सूत्र असेल, असं संजय राऊत म्हणाले.
इंडिया आघाडीचा देशभरात जो जिंकेल तो लढेल हाच फॉर्म्युला आहे, असं संजय राऊत म्हणाले. काल जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड मातोश्रीवर आले होते. उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांनी चर्चा केली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कुठं लढेल यासंदर्भातील माहिती दिली. यासंदर्भातील चर्चा केली. काँग्रेस नेत्यांसोबत देखील चर्चा होईल. आम्ही गांभीर्यानं जागा वाटपावर चर्चा करत आहोत. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याबाबत देखील चर्चा सुरु आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
मेरिटवर जागावाटप होईल हेच मुख्य सूत्र आहे, असं संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्रात काँग्रेसचं केडर आहे, काँग्रेसची ताकद आहे, असं म्हटलं आहे. आज काँग्रेसकडे एकही खासदार नाही, असं म्हटलं होतं. आमच्याकडे १८ होते काही जण निघून गेले आमच्याकडे ६ खासदार आहेत. राष्ट्रवादीकडे आता ३ आहेत. राज्यात मविआ ४० जागांवर विजयी होईल, असं संजय राऊत म्हणाले.