(जिल्हा संपादक:शैलेश चौधरी)
एरंडोल:-येथे ३१ ऑगस्ट २०२१- मंगळवार रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास मरीमाता चौकात पाच बैल कत्तलीसाठी नेणारे वाहन एरंडोल पोलिसांनी पकडले. या जनावरांची किंमत दीड लाख रुपये आहे.
एम.एच.२८ एबी.०४४९ क्रमांकाच्या पिकअप गाडीच्या बॉडी ला काळ्या रंगाची ताडपत्री लावून अवैधरीत्या पाच बैलांची वाहतूक करून कत्तलीसाठी नेत होते अशी माहिती एरंडोल पोलीस स्टेशन सुत्रांनी दिली.
याबाबत एरंडोल पोलीस स्टेशनला भाग ६ गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर कलम ‘महाराष्ट्र प्राणी रक्षण, (सुधारणा) अधिनियम १९९५ चे कलम ५अ (१)प्राणी क्लेश प्रतिबंध कायदा १९६० चे कलम ११(१)(डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस कॉन्स्टेबल पंकज पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून आरोपी शेख लुकमान शेख मुसा व शेख अब्दुल शेख रहीम दोन्ही राहणार स्नेह नगर सिल्लोड (औरंगाबाद) येथील आहेत. दोन फिक्कट तांबड्या रंगाचे बैल व तीन पांढऱ्या रंगाचे असे एकूण पाच बैलांसह पिकअप वाहन जप्त करण्यात आले आहे.
पुढील तपास पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष चौधरी व पंकज पाटील हे करीत आहेत.