वर्षाच्या शेवटच्या दिवशी धक्कादायक घटना! कचराकुंडीत आढळले कापडात गुंडाळलेले जिवंत अर्भक

कोल्हापूर: कोल्हापुरात सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी नियोजन सुरू आहे. असे असताना याच कोल्हापुरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापुरातील कसबा बावडा येथील गजबजलेल्या वस्तीत एका पेट्रोल पंपाच्यासमोर रस्त्याच्या कडेला एक दिवसाचे स्त्री जातीचे अर्भक टाकून दिल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आज सकाळी महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना हे अर्भक कचऱ्यात पडल्याचे दिसून आल्यानंतर तर का वरिष्ठांना कळवत या अर्भकला सेवा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कर्ज झाल्याने लढवली शक्कल; दरोड्याचा बनाव करणारा फिर्यादीच निघाला चोर, असं फुटलं बिंग
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या कसबा बावडा येथे श्रीराम सेवा संस्थेचे पेट्रोल पंप आहे. याच पेट्रोल पंपाच्या समोर उघड्यावर कचरा कोंडाळ असून परिसरातील नागरिक येथे कचरा टाकतात. यामुळे आज सकाळी साडेआठच्या सुमारास कोल्हापूर महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी कचरा उचलण्यासाठी येथे आले होते. उघड्या कोंडाळ्यातील पडलेला कचरा खोऱ्याने एकत्रित करत असताना कचऱ्यात लहान मुलाचा रडचताना आवाज कर्मचाऱ्यांना आला. मात्र एखादी खेळणी आहे, असे समजून स्वच्छता कर्मचारी कचरा गोळा करण्यात व्यस्त झाले. मात्र पुन्हा मुलाचा रडतानाचा आवाज आल्याने स्वच्छता कर्मचाऱ्यांनी जवळ जाऊन पाहिले.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साई भक्तांची गर्दी, साई नामाच्या जयघोषाने साई नगरी दुमदुमली

यावेळी कचऱ्यामध्ये एका कापडात गुंडाळून एक दिवसाच स्त्री जातीचे अर्भक टाकलेले निदर्शनास आले. यानंतर स्वच्छता कर्मचाऱ्यांनी त्वरित याची माहिती आरोग्य निरीक्षकांना दिली. तसेच या अर्भकाला दुसऱ्या स्वच्छ कापडामध्ये घेऊन तत्काळ सेवा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले. हा अर्भक रात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत कोणीतरी टाकला असावा, असा अंदाज सध्या लावण्यात येत असून याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तर पोलिसांनी तत्काळ पुढील तपास सुरू केला आहे.

Source link

infant found in kolhapurinfant found newsKolhapur newsअर्भक सापडलं बातमीकोल्हापुरात अर्भक सापडलेकोल्हापूर बातमी
Comments (0)
Add Comment