नितीन करीर यांची मुख्य सचिवपदी निवड करण्यात आली असली तरी त्यांच्याकडे पुढील तीन महिन्यांचा कालावधी असेल. नितीन करीर हे ३१ मार्च २०२४ रोजी निवृत्त होत आहेत. त्यानंतर आयएएस अधिकारी सुजाता सौनिक यांना संधी मिळू शकते.
नितीन करीर यांच्या नावासाठी राज्य मंत्रिमंडळातील काही सदस्य आग्रही असल्याची चर्चा होती. काही मंत्र्यांनी नितीन करीर यांना मुख्य सचिव पदासाठी संधी दिली जावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.
राज्याच्या मुख्य सचिवपदी नितीन करीर यांची नियुक्ती झाली आहे. करीर हे १९९८ च्या बॅचचे अधिकारी आहेत. सध्या ते वित्त विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते. आता मुख्य सचिव म्हणून काम पाहतील. नितीन करीर हे मावळते मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडून साडे पाच वाजता पदभार स्वीकारतील. नितीन करीर यांची सेवानिवृत्ती ३१ मार्चला असल्यानं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीन करीर यांना पुढे तीन महिन्यांची मुदतवाढ दिली जाऊ शकते.
सध्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक हे आज निवृत्त होत आहेत. त्यांना मुदतवाढ मिळावी यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे पत्र व्यवहार केला होता. मात्र, केंद्रानं त्या प्रस्तावाला मंजूर न केल्यानं नितीन करीर यांची मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नितीन करीर यांनी यापूर्वी महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागात काम केलेलं आहे. ते सध्या वित्त विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते.
Read Latest Maharashtra News And Marathi News