पारंपारीक उत्सवाच्या खर्चास फाटा देत सामाजिक कार्यकर्त्या पती-पत्नी कडून ३२हजार रूपयांचे सत्कारणी योगदान

(जिल्हा संपादक:शैलेश चौधरी)

एरंडोल: येथे गोकुळाष्टमी निमित्त सामाजिक कार्यकर्ता आनंद भाऊ दाभाडे व नगरसेविका सौ.छायाताई आनंद दाभाडे आणि मरीमाता चौक मित्र मंडळ यांचे तर्फे प्रतीवर्षी दहीहंडी साजरी करण्यात येते परंतू यावर्षी कोणताही वायफळ खर्च न करता दि.२१ऑगस्ट रोजी शहरातील प्रसिद्ध डबेवाले विजय भालचंद्र जोशी हे धरणगाव रस्त्यावर झालेल्या आकस्मित अपघातात गंभीर जखमी झाले असता त्यांना न्यूक्लियस हॉस्पीटल येथे भरती करण्यात आले,त्यांची परीस्थिती अत्यंत हलाखिची असल्याने तसेच त्यांचेवर २ते३ ऑपरेशन्स करावी लागणार असल्याने विविध प्रसारमाध्यमांद्वारे दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन करण्यात आले होते.त्या आवाहनास प्रतीसाद देत सामाजिक कार्यकर्ते आनंद भाऊ दाभाडे व नगरसेविका सौ.छायाताई आनंद दाभाडे या समाजसेवी पती-पत्नी कडून २१०००/- रुपये जोशी डबेवाले यांच्या उपचारासाठी देण्यात आले.बरोबरच शहरातील विरगती प्राप्त जवान राहुल लहू पाटील यांच्या कुंटुंबियांस सांत्वनार्थ ११०००/-रुपये देण्यात आले,याप्रसंगी दिवंगत जवान राहूल पाटील यांच्या मातोश्रींना गहीवरून आले. त्यांनी उभयतांना आशिर्वाद दिले. या कार्यक्रमास नगराध्यक्ष रमेशभाऊ परदेशी,नगरसेवक प्रा.मनोजभाऊ पहेलवान API तुषार देवरे साहेब,नगरसेवक बबलूभाऊ पहेलवान,नगरसेवक कुणालभाऊ महाजन,सामाजिक कार्यकर्ता सुरेश भाऊ दाभाडे,अमोलभाऊ तंबोली,संदीप सातपुते,अनिल पाटील,प्रवीण चौधरी,संदीप तंबोली,अमोल सोनवणे,आनंदा चौधरी,सोनू शिंपी,नितिन पांचाल,दिपक पांचाल,नितिन लोहार,अनिल खंदारे,गणेश लोहार,सुनिल बडगुजर,प्रवीण महाजन व सर्व मरीमाता चौक मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments (0)
Add Comment