नाशिक: सिन्नर, त्र्यंबकेश्वरपाठोपाठ नाशिक शहरातही करोनाच्या नव्या व्हेरिएंटचा शिरकाव झाला आहे महात्मानगर परिसरातील दोन महिलांना तर अंबड परिसरातील एका युवकास करोनाची लागण झाल्याचे तपासणी अहवालातून निष्पन्न झाले आहे. त्यामुळे महापालिकेची आरोग्य-वैद्यकीय यंत्रणा अलर्ट मोडवर आली असून रुग्ण आढळलेल्या परिसरात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येत आहे.
शहरातही करोनाचे एक-दोन नव्हे तर एकाचवेळी तीन रुग्ण आढळून आले आहेत. महात्मानगरमधील ३२ वर्षीय महिलेला सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवू लागल्यानंतर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या महिलेची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटीव्ह आढळून आली आहे. सदर महिलेवर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

महात्मानगर परिसरातीलच एक अन्य ४२ वर्षी महिलेला सर्दीचा त्रास झाला. अॅन्टीजेन चाचणीत सदर महिला करोना पॉझिटीव्ह आढळून आली. अंबड परिसरातील २४ वर्षीय युवकही अॅन्टीजेन चाचणीत पॉझिटीव्ह आढळून आला आहे. या दोन्ही रुग्णांना फारसा त्रास जाणवत नसल्यामुळे प्राथमिक औषधोपचारानंतर गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे.