तुरीच्या दरात मोठी घसरण, आवक वाढल्याने शेतकऱ्यांना फटका, कधी होणार भाववाढ? अभ्यासक म्हणाले…

अकोला : नवीन तूर बाजारात येताच कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात घसरण सुरू झाली आहे. तूरीचा दर गेल्या दीड महिनाभऱ्यात २ हजार ७३० रुपयांनी घसरला आहे. आता सर्वच बाजारात नवीन तुरीची आवक हळूहळू वाढू लागल्यानंतर तुरीचे दर अजून कमी होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान अकोल्याच्या कृषी बाजारात गेल्या ४ नोव्हेंबरला तुरीला कमाल भाव १२ हजार ३२५ रूपये प्रतिक्विंटलप्रमाणे होता, अन् आजच्या तारखेत म्हणजेच काल शनिवारी कमाल भाव ९ हजार ५९५ रूपयांवर प्रतीक्विंटल आला आहे.

यंदा देशातील तुरीच्या उत्पादनात मोठी घट झाली असून त्यात आयात वाढीवर मर्यादा आहेत. त्यामुळे तुरीच्या भावात पुन्हा चांगली वाढ होऊ शकते. पण, तुरीच्या दरवाढीसाठी मार्चपर्यंत वाट पहावी लागेल, असा कृषी अभ्यासकांचा अंदाज आहे.

मालकाच्या विश्वासाला तडा, मैत्रिणीच्या मदतीने लाखोंचा चुना, साडीसेंटरमधील अकाऊंटन्टचा कारनामा

दरम्यान अकोला जिल्ह्यातील अकोल्यासह अनेक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीचे भाव नोव्हेंबर महिन्यात सरासरी १० ते ११ हजार रुपये तर कमाल भाव १२ हजारांवर प्रतिक्विंटलच्या दरम्यान होते. पण मागील पंधरा दिवसांपासून तुरीच्या भावात सतत घट होत गेली. या महिन्यतोल ११ डिसेंबर रोजी तुरीला १० हजार १५५ किमान भाव तर सरासरी भाव ९ हजार ८०० रूपये इतका होता. त्यानंतर २१ डिसेंबरला कमीत कमी ७ हजार ४०० पासून जस्तीत जास्त ९ हजार ७०५ रूपये दर मिळाला. शुक्रवारी (२९ डिसेंबर) तुरीला किमान ६ हजार ५ ते कमाल ९ हजार ८०० रुपये तर सरासरी ८ हजार रुपये भाव मिळाला. काल शनिवारी म्हणजेच सध्या तुरीला किमान ६ हजार ७०० ते ९ हजार ५९५ रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. अकोला बाजार समितीतही दर गेल्या आठवडाभरापासून ८ हजार ५०० रुपयांवर स्थिर आहेत. दरम्यान काल शनिवारी २७३ क्विंटल एवढी तूर खरेदी झाली आहे.

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही बाजारांमध्ये तुरीची आवक हळूहळू वाढत आहे. ही आवक आणखी एक महिन्यानंतर जास्त होऊ शकते. बाजारात आवक वाढल्यानंतर भाव कमी होतात. त्यातच आफ्रिका आणि म्यानमारमधून तूर आयात केली जाणार आहे. यामुळे सध्या भाव कमी झाले आहेत, असे बाजार समितीतील आडते-व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.

खताचं पोतं, कांदा, सोयाबीन ते गॅस… शेतकऱ्याने प्रत्येक मुद्द्यावर सुनावलं, मोदींची संकल्प रथयात्रा अडवली

Source link

agriculture newsakola apmc marketAkola newstur rate newsअकोला न्यूजतुरीचा भावतूर दरबाजार समितीशेती बातम्या
Comments (0)
Add Comment