नव वर्षाच्या सुरुवातीलाच सामान्यांच्या खिशाला चिमटा बसणार? भाज्यांचे दर कडाडले, वाचा सविस्तर

छत्रपती संभाजीनगर: मागच्या काही आठवड्यांपासून भाज्यांचे दर चढेच असून त्यात अजूनही फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे फळे आणि भाज्यांसाठी अनुकूल असलेल्या हिवाळ्यात चक्क उन्हाळ्याप्रमाणे चढ्या दराने भाज्या विकत घेण्याची वेळ येत आहे. सद्यस्थितीत बहुतांश फळभाज्या २० ते ३० रुपये पावशेर या दराने विकल्या जात आहेत.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी सिंहगडावर पर्यटकांची गर्दी, कोंडी टाळण्यासाठी पायथ्याशी थांबवलं
भेंडी, दोडके, फुलकोबी, वांगे, गवार, श्रावणघेवडा आदी बहुतांश फळभाज्या २० ते ३० रुपये पावशेर या दराने विकल्या जात आहेत. काकडा मिरचीची ४० रुपये पावशेरने रविवारी (३१ डिसेंबर) किरकोळ विक्री झाली. याच काकडा मिरचीची तीन हजार ते चार हजार ५०० रुपये क्विंटलने जाधववाडीत रविवारी घाऊक विक्री झाली. मेथी, पालक आणि इतर पालेभाज्याही सर्वसाधारणपणे १५ ते २० रुपये प्रति जुडीप्रमाणे विकल्या जात आहेत. कोथिंबिरीचा दर १० रुपये जुडी असा आहे. आल्यात किरकोळ घट असून, ४० रुपये पावशेरने आल्याची विक्री होत आहे. लसूण ६० ते ७० रुपये पाव किलो या दराने विकला जात आहे.

कोकणातला प्रकल्प गुजरातला गेला, पण राणे, सामंत, केसरकर शिवसेनेवर टीका करण्यात गुंग

मागच्या काही महिन्यांपासून डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याचा दर काहीसा उतरला आहे. चक्क ७० ते ८० रुपये किलोने काही दिवसांपूर्वीपर्यंत विक्री होत असणाऱ्या कांद्याची किरकोळ विक्री आता ३० ते ४० रुपये किलोने होत आहे. त्यातही पांढरा गावरान कांदा ४० रुपयांपर्यंत विकला जात आहे. टोमॅटोचे भाव सतत कमी-अधिक होत असले, तरी रविवारी ४० रुपये किलोने टोमॅटोची विक्री झाल्याचे स्पष्ट झाले. एकीकडे भाज्यांचे दर वाढत असतानाच अंडीदेखील भाव खात असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत ७० रुपये डझनने विकल्या गेलेल्या अंड्यांचे भाव ८४ ते ९० रुपये डझनपर्यंत गेले आहेत.

Source link

chhatrapati sambhajinagar newsvegetables rate increasedvegetables rate newsछत्रपती संभाजीनगर बातमीभाज्यांचे दर बातमीभाज्यांचे दर वाढले
Comments (0)
Add Comment