कोकणात भाजप कार्यालयाची तोडफोड; शिवसेनेनं राणेंना पुन्हा डिवचलं!

हायलाइट्स:

  • शिवसेनेनं पुन्हा एकदा राणे आणि भाजपला डिवचलं
  • भाजप कार्यालयाची तोडफोड केल्याचा प्रकार
  • राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे

खेड : भाजप नेते नारायण राणे यांनी केंद्रात मंत्रिपदाची शपथ घेतली आणि राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप (Shivsena Vs BJP) असा संघर्ष उभा राहिला. नारायण राणे (Narayan Rane) यांनी काढलेली जन आशीर्वाद यात्रा अनेक कारणांमुळे चर्चेत राहिली. या यात्रेतीलच एका वक्तव्यामुळे राणे यांना अटकही करण्यात आली होती. ही जन आशीर्वाद यात्रा संपल्यानंतर हा राजकीय संघर्ष कमी होईल अशी शक्यता होती. मात्र कोकणात शिवसेनेनं पुन्हा एकदा राणे आणि भाजपला डिवचलं आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शहर भाजप कार्यालयाची तोडफोड केल्याचा प्रकार आज घडला आहे. भाजप कार्यालयात कोणी नसताना काही युवासैनिकांनी कार्यालयाबाहेरील बॅनर फाडून तोडफोड केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. या प्रकाराने राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत.

Sharad Pawar: शरद पवार यांची सह्याद्रीवर महत्त्वाची बैठक; मंत्री, नेत्यांना काय सांगितलं?

नारायण राणेंविरोधात आंदोलन करणाऱ्या युवासेनेच्या कार्यकर्त्यांना भाजप शहराध्यक्ष अनिकेत कानडे यांनी सज्जड दम भरला होता. त्यावेळी झालेल्या नाचक्कीमुळे आज मंगळवारी ३१ ऑगस्ट रोजी युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयाची तोडफोड केल्याचं बोललं जात आहे. भाजप शहाराध्यक्ष अनिकेत कानडे यांनी युवासेनेवर तोडफोडीचा आरोप केला आहे

दुसरीकडे, खेड युवासेनेचे जिल्हाधिकारी अजिंक्य मोरे यांनी आम्ही आमच्या शिवसेना स्टाईलने उत्तर दिल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान, युवासेनेनं पुन्हा एकदा नारायण राणे यांना डिवचल्याने या घटनेचं कोकणात नेमके काय पडसाद उमटतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Source link

bjpkhed newsNarayan RaneShivsenaखेडनारायण राणेभाजपशिवसेना
Comments (0)
Add Comment