संजय राऊत म्हणाले अजितराव टोपी उड जायेगी; अजितदादा म्हणतात मी सोम्या-गोम्याच्या…

पुणे : शरद पवार गटाचे खासदारडॉ. अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी तीन दिवसीय शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. या आक्रोश मोर्चाची सांगता पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यावेळी मविआचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. त्यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती की, ” आमच्या पाडापाडीच्या राजकारणात तुम्ही पडू नका, हवा तो बहुत तेज चल रही है अजितराव, टोपी उड जाएगी अशी टीका केली होती. राऊतांच्या टीकेला आता अजित पवार यांनी उत्तर दिले असून मी सोम्या-गोम्याच्या टीकेला उत्तर देत नाही असे अजित पवार म्हणालेत.

पुण्यातील पेरणेफाटा येथे ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही टीका केली आहे. यावेळी अजित पवार म्हणाले की, २०२४ मध्ये पहिल्यांदा लोकसभा पार पडणार आहे. त्याबाबत काही सर्व्हे आलेत ते देखील आपण पाहिले आहेत. नुकत्याच पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्या त्याचे निकाल आपण पाहिले आहेत. त्यामुळे देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही.

गुडन्यूज! मुंबईतील ‘या’ भागात लवकरच बहुमजली वाहनतळ, कशी असणार पार्किंग सुविधा? जाणून घ्या

अजित पवार यांनी नववर्षाच्या शुभेच्छा देताना सांगितले की, राज्यातील कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहावी. महाराष्ट्रातला कुठलाही घटक त्याच्या लाभापासून वंचित राहू नये . राजकारणाच्या ठिकाणी राजकारण ठीक आहे परंतु कारण नसताना विरोधाला विरोध करून काही तरी वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करायचे ही जी काय पद्धत अलीकडच्या काळात सुरू झालीये ती काही योग्य नाही. एखादी गोष्ट चुकली असेल तर सर्व मंत्रिमंडळाची ती दुरुस्त करण्याची तयारी आहे. परंतु कारण नसताना बदनामी करण्याचे काम, गैरसमज पसरवण्याचे काम, वस्तुस्थिती तशी नसताना काही तरी अफवा पसरवण्याचे काम हे अलीकडच्या काळात कुठे तरी चाललंय ते कुठं तरी थांबल पाहिजे, हे आपल्या महाराष्ट्राच्या हिताचे नसल्याचे अजित पवार म्हणालेत.

भर सभेत अजित पवारांवर टीका करणाऱ्या संजय राऊतांना अमोल मिटकरींचा थेट इशारा

Source link

ajit pawarajit pawar slams snajay rautNarendra ModiPune newsअजित पवारअजित पवारांची राऊतांवर टीकापुणे न्यूजविजयस्तंभ अभिवादनसंजय राऊत
Comments (0)
Add Comment