कौतुकास्पद! कृषी क्षेत्रात महत्वपूर्ण संशोधन; कोकणातील दोन सुपुत्रांना मानद डॉक्टरेट प्रदान

सिंधुदुर्ग: कोकणातील प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी वेगवेगळे प्रयोग दरवषी करत असतात. काही शेतकरी आंब्यावर संशोधन करत असतात. तर काही भेंडीवर संशोधन करतात. त्यामुळे सिंधुदुर्गातील दोन शेतकऱ्यांनी संशोधन करून करून इतर शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे. याची दखल दिल्लीच्या इंडिया इंटरनॅशनल सेंटर या संस्थेने दखल घेत या दोन शेतकऱ्यांना मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील दोन सुपुत्रांना अशा प्रकारची दुर्मिळ डॉक्टरेट मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा रंगू लागली आहे. कौतुकही केले जात आहे.
कॅन्सरग्रस्तांसाठी कडू गोळीऐवजी सिरप; टाटा रुग्णालयाकडून केमोथेरपी औषधावर संशोधन
मालवण कुंभारमाठचे सुपुत्र, आदर्श शेतकरी उत्तम सूर्यकांत फोंडेकर यांना मागील तीन वर्षातील हापूस आंब्यांचे प्रथम उत्पादन घेण्याच्या कार्याबद्दल आणि संशोधनाबद्दल नोव्हेंबर महिन्यात जाहीर झालेली कृषी क्षेत्रातील मानद डॉक्टरेट दिल्लीत ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर’ येथे कुलगुरू, कुलसचिव, कृषी उच्चायुक्त आणि अंबासि इकॉनॉमिक चान्सलर यांच्या हस्ते गोल्ड मेडल, ऑर्डरसहित डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. तसेच वेंगुर्ला आडेलीचे सुपुत्र अनंत दिगंबर आजगांवकर यांनी लाल भेंडीमध्ये संशोधन करून ब्राऊन, पिस्ता, वेलवेट रेड या जाती निर्माण केल्या. अखिल भारतीय पातळीवर चाचणी होऊन त्याचे अधिकार आजगावकर यांना प्रदान करून त्यांना डॉक्टरेट प्रदान करण्यात आली.

ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून रक्तदान, सामाजिक कार्य करत नववर्षाची सुरुवात

महाराष्ट्रात कृषी क्षेत्रातील पहिली डॉक्टरेट अहमदनगरचे आदर्श सरपंच डॉ. पोपटराव पवार यांना गेल्या वर्षी प्रदान करण्यात आला. त्यानंतर या सिंधुदुर्गातील दोन सुपुत्रांना अशा प्रकारची दुर्मिळ डॉक्टरेट मिळाली आहे. त्यांचे जिल्हा कृषी अधीक्षक विजयकुमार राऊत यांनी अभिनंदन केले आहे.त्यांच्या या यशाबद्दल डॉक्टर उत्तम फोंडेकर आणि डॉक्टर आजगांवकर यांचे विमानतळावर उतरून वेंगुल्यांत आल्यावर दोघांची भटवाडी ते खर्डेकर कॉलेजपर्यंत वेंगुर्लावासियांनी जंगी मिरवणूक काढली.

Source link

agricultural sector agricultural sectorsindhudurg newsyouth honorary doctorateकृषी क्षेत्र संशोधनतरुणांना मानद डॉक्टरेट प्रदानमानद डॉक्टरेट प्रदानसिंधुदुर्ग बातमी
Comments (0)
Add Comment