नाशिक मुंबई महामार्गावर भीषण अपघात, भरधाव मर्सिडीजची आयशरला धडक, तिघांच्या मृत्यूनं हळहळ

नाशिकः राज्यातील अपघातांचं प्रमाण वाढत असल्याचं चित्र आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिक – मुंबई महामार्गावर असलेल्या इगतपुरी तालुक्यातील बोरर्टेंभे येथे भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.भरधाव वेगातील मर्सिडीज कारने भाजीपाला घेऊन जाणाऱ्या आयशरला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने आज पहाटेच्या सुमारास अपघात झाला आहे. या घटनेत ३ जण ठार तर १ जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. अपघातग्रस्त कारमधील प्रवासी हे मुंबईतील असल्याची प्राथमिक माहिती असून त्यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत.
गुलामगिरी स्वीकारलेल्यांचे सोमे-गोमे दिल्लीत, संजय राऊतांचा अजित पवारांना सणसणीत टोला
भरधाव मर्सिडीजनं आयशरला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं हा अपघात झाला आहे. अपघातात एमएच ०२ ईएक्स ६७७७ या क्रमांकाच्या मर्सिडीज कारचा चक्काचूर झाला आहे. या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. मर्सिडीज आणि आयशर अपघाताची माहिती मिळताच रूट पेट्रोलिंग टीम, टोल प्लाझा रुग्णवाहिका आणि महामार्ग पोलीस घोटी हे घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्य सुरु केले. नवीन वर्षाच्या सुरुवातीला पहिल्याच दिवशी अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
जपानमध्ये नववर्षाला भीषण भूकंप, ७.४ रिश्टर स्केलच्या धक्क्याने जमीन हादरली; समुद्र उसळला, त्सुनामी अलर्ट
दरम्यान, या अपघातानंतर टोल प्लाझा रुग्णवाहिका आणि रूट पेट्रोलिंग टीमने या ठिकाणी मदत कार्य राबवले त्यानंतर पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेत मृतदेहांचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवले असून जखमी अपघातग्रस्तांना देखील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. अपघातातील जखमी सह मृत पावलेले मुंबई येथील असल्याची माहिती मिळाली असून त्यांचे अद्याप नावे समजू शकलेली नाही.
लोकसभेसाठी मविआचं अधिकृत जागा वाटप कधी जाहीर होणार, सुप्रिया सुळेंनी थेट तारखा सांगितल्या, म्हणाल्या…

शासनाच्या निर्णयाच्या निषेधार्थ ट्रक चालकांची निदर्शने, नागपूर-भंडारा महामार्गावर वाहतूक कोंडी

Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

accident newsmercedes eicher accidentNashik newsnashik news todayइगतपुरी बोरर्टेंभे अपघातनाशिक अपघातनाशिक बातम्यानाशिक मुंबई महामार्गनाशिक मुंबई महामार्ग अपघातमर्सिडीजची आयशरला धडक
Comments (0)
Add Comment