Marathwada Rains: मराठवाड्यात अतिवृष्टी; राष्ट्रवादीने तातडीने घेतला ‘हा’ निर्णय

हायलाइट्स:

  • अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात अनेक भागांत जनजीवन विस्कळीत.
  • बीड जिल्ह्यात पूरस्थितीमुळे काही गावांचा संपर्क तुटला.
  • राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व कार्यक्रम रद्द करत घेतला मोठा निर्णय.

बीड: बीड जिल्ह्यातील माजलगाव, गेवराई, बीड यांसह काही तालुक्यांमध्ये सोमवारी सायंकाळपासून मुसळधार पाऊस पडत असून, बहुतांश भागात अजूनही पाऊस सुरू आहे तसेच काही तालुक्यात आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे; या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने २४ तास सतर्क राहून आवश्यक तिथे मदत कार्य करावे अशा सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या आहेत. दरम्यान, मराठवाडा विभागात अनेक भागांत अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ( Marathwada Rains Latest Update )

वाचा: जळगावात पावसाचं रौद्र रूप; १५ गावांना पुराचा वेढा, दोघांचा बुडून मृत्यू

बीडमध्ये अनेक ठिकाणी खरीप पिकांचे व फळ बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पावसाने उघडीप देताच विमा कंपनी, महसूल व कृषी विभागामार्फत पंचनामे करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येईल. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा व मदत देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. काही गावांचा संपर्क तुटल्याचेदेखील वृत्त येत आहे, त्यामुळे आधी नागरिकांच्या सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज रहावे, कुठेही जीवित किंवा वित्त हानी होणार नाही या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश मुंडे यांनी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांना दिले आहेत. पावसाचा तडाखा पूर्णपणे कमी होईपर्यंत नागरिकांनी काळजी घ्यावी, धोक्याचे ठिकाण, जलाशय, वाहत्या नद्या अशा ठिकाणी जाण्याचे टाळावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही मुंडे यांनी जिल्हावासियांना केले आहे.

वाचा: पावसाचा हाहाकार! ‘या’ जिल्ह्यात झाली ढगफुटी, अनेक गावांना सतर्कतेचा इशारा

राष्ट्रवादीचे सर्व कार्यक्रम स्थगित

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर पक्षाचे सर्व संघटनात्मक व राजकीय कार्यक्रम स्थगित करून पक्षसंघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मदतकार्यासाठी पुढाकार घ्यावा, असे निर्देश प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत.

वाचा: परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री निधीत जमा केले ५० हजार रुपये; कारण…

Source link

beed rains dhananjay munde newsheavy rain in marathwadajayant patil on marathwada rainsmarathwada rainsmarathwada rains latest updateजयंत पाटीलधनंजय मुंडेबीडमराठवाडाराष्ट्रवादी
Comments (0)
Add Comment