मदन बाफना यांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना म्हणाले होते की, शरद पवार आमचे नेते आहेत. आजकाल बापाला बाप म्हणण्याची संस्कृती राहिलेली नाही. बापाला विसरायचं नसतं. संस्कार सगळ्यांनी सोडले आहेत. असे संस्कार सोडलेल्या लोकांना मी बोलून दाखवणारं असे मदन बाफना म्हणाले होते.
यावेळी सुनील शेळके म्हणाले की, मला बाफना साहेबांना विनंती करायची आहे की, तुम्हाला देखील मावळच्या माय बाप जनतेने डोक्यावर घेतलं. तुमचा काळ हा वेगळा होता आमचा काळ वेगळा आहे. तुमच्या पिढीत आणि आमच्या पिढीत फरक आहे. बाफना साहेब वडिलकीच्या नात्याने आम्हाला आशीर्वाद द्या. आमची भूमिका तुम्हाला पटली नसेल तर तुम्ही तुमची भूमिका घ्या. परंतु दादांना, सुनील शेळके किंवा राष्ट्रवादी पक्षाला चुकीच्या पद्धतीने बोलू नका. चुकीचं स्टेटमेंट करू नका.
आमच्या नेत्याचा अपमान जर तुम्ही केला तर जशास तसं उत्तर तुम्हाला देणार. आपण माझ्या नेत्याच्या बद्दल अपशब्द काढू नका. मागच्या दोन महिन्यांपूर्वी सुनील शेळके खूप चांगला आमदार आहे. खूप चांगली कामे करतो असे म्हणणारा माणूस दोन महिन्यात अचानक का बदलले मला माहित नाही. म्हणून बाफना साहेब आपण वडिलकीच्या नात्याने आम्हाला आशीर्वाद देत रहा. तुमच्या काही अडचणी असतील तर सांगा. परंतु तुम्ही पुन्हा जर काही आमच्या नेत्याबद्दल बोलले तर मी तुमचा हिशोब काढणार एवढं माझं तुम्हाला सांगणं आहे. आम्ही तुमचा मान ठेवतो तुम्ही.आमच्या नेत्याचा मान ठेवा एवढंच तुम्हाला सांगणं आहे. असे म्हणत आमदार सुनिल शेळके यांनी माजी आमदार मदन बाफना यांना इशारा दिला आहे.