कॅन्सरग्रस्तांसाठी कडू गोळीऐवजी सिरप; टाटा रुग्णालयाकडून केमोथेरपी औषधावर संशोधन

मुंबई: लहान मुलांमधील रक्ताच्या कर्करोगावरील उपचारपद्धतीमध्ये, तोंडी केमोथेरपीमध्ये यापूर्वी गोळ्या दिल्या जात होत्या. मात्र आता त्याऐवजी आता सिरप विकसित करण्यात आले आहे. टाटा मेमोरिअल रुग्णालय, अॅडव्हान्स सेंटर फॉर ट्रेनिंग रिसर्च अॅण्ड एज्युकेशन इन कॅन्सर, आयडीआरएस लॅब (बंगळूर) यांच्या सहकार्याने ‘मर्केपटोप्युरिनि’ हे केमोथेरपीसाठी पावडर स्वरुपामध्ये घेण्यात येणारे औषध आता बालरुग्णांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

रक्ताचा कॅन्सर असलेल्या मुलांना त्यांच्या वजनानुसार या गोळीची मात्रा देण्यात यायची. मात्र कमी मात्रेच्या गोळ्या देताना काही वेळा अडचण येते. या सिरपमुळे ही अडचण दूर होणार आहे. हे सिरप प्राथमिक टप्प्यांवर पावडरच्या स्वरुपामध्ये उपलब्ध असून ते आयडीआरएस लॅब्स प्रायव्हेट लिमिटेडचे पेटंट तंत्रज्ञान आहे. २५ नोव्हेंबर रोजी चेन्नई येथील परिषदेमध्ये याची घोषणा केली. या महिन्याच्या सुरुवातील टाटा कॅन्सर रुग्णालयामध्ये हे उपलब्ध झाले. लवकरच देशातील सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये हे औषध उपलब्ध होणार आहे. १ ते १० वयोगटातील अंदाजे १० हजार मुलांना प्रत्येक वर्षी याचा वैद्यकीय लाभ मिळणार आहे.
गुडन्यूज! मुंबईतील ‘या’ भागात लवकरच बहुमजली वाहनतळ, कशी असणार पार्किंग सुविधा? जाणून घ्या
बालकॅन्सर विभागाचे प्रमुख डॉ. गिरीश चिन्नास्वामी यांनी सांगितले, की टाटा रुग्णालायमध्ये सर्व प्रकारच्या कर्करोगांवर उपचार केले जातात. त्यांना सर्वोत्तम रुग्णसेवा दिली जाते. या सिरप स्वरुपातील औषधांमुळे लहान मुलांना निश्चितपणे मदत होईल. औषध घेण्याविषयी त्यांच्या मनात निर्माण होणारी अढी निघून जाईल. तर क्लिनिकल फार्माकोलॉजी विभागाचे प्रा. डॉ. विक्रम गोटा यांनी, उष्ण तसेच दमट अशा कोणत्याही स्वरुपाच्या वातावरणामध्ये या औषधांच्या मुळ गुणधर्मावर परिणाम होत नाही, असे सांगितले.

टाटा स्मारक केंद्राचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी, औषधांच्या संदर्भात वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू असलेले संशोधन हे कॅन्सर उपचारपद्धतीमध्ये उपयुक्त ठरेल. टाटा कॅन्सर रुग्णालायमध्ये अशा प्रकारच्या प्रयोगशील संशोधन संस्थांची मदत घेऊन सांघिकरित्या केलेल्या प्रयत्नांमुळे निश्चितपणे मदत मिळते, असे सांगितले.

ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून रक्तदान, सामाजिक कार्य करत नववर्षाची सुरुवात

हे औषध पावडरच्या स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. या औषधांच्या पॅकिगमध्ये शुद्ध स्वरुपातील पाणी असते. ड्रॉपरच्या मदतीने या पावडरमध्ये पाणी घालून त्याचे सिरप तयार करण्यात येते. टाटा कॅन्सर रुग्णालयाचे शैक्षणिक संचालक डॉ. श्रीपाद बाणावली यांनी सिरपमुळे रुग्णांची कडू गोळीपासून सुटका होणार आहे. सध्या हे औषध अमेरिका तसेच युरोपमध्येही उपलब्ध आहे, असे सांगितले.

Source link

cancer sufferer newssyrup instead of bitter pill for cancer suffererstata hospital newsकॅन्सरग्रस्तांसाठी कडू गोळीऐवजी सिरपकेमोथेरपी औषधावर संशोधनटाटा रुग्णालय बातमीमुंबई बातमी
Comments (0)
Add Comment