या भरतीमध्ये एमबीबीएस डॉक्टर (महिला), एएनएम/स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट या पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून ०५ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याचे सर्व तपशील जाणून घेऊया.
‘राष्ट्रीय आरोग्य अभियान गोंदिया भरती २०२४’ मधील पदे आणि पदसंख्या –
लेडी एमबीबीएस डॉक्टर – ०१ जागा
एएनएम/स्टाफ नर्स – ०१ जागा
लॅब टेक्निशियन – ०१ जागा
फार्मासिस्ट – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०४ जागा
शैक्षणिक पात्रता –
लेडी एमबीबीएस डॉक्टर – एमबीबीएस आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल मध्ये नोंदणीकृत (For Ayush Doctor MCIM Registration)
एएनएम/स्टाफ नर्स – एएनएम/ जीएनएम/ बीएससी नर्सिंग आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मध्ये नोंदणीकृत
लॅब टेक्निशियन – विज्ञान शाखेतून बारावी परीक्षा उत्तीर्ण आणि डीएमएलटी (Registration of MSBTE, Mumbai)
फार्मासिस्ट – डी. फार्मसी किंवा बी. फार्मसी आणि महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिल मध्ये नोंदणीकृत
वेतन –
लेडी एमबीबीएस डॉक्टर – ६० हजार
एएनएम/स्टाफ नर्स – १८ हजार
लॅब टेक्निशियन – १८ हजार
फार्मासिस्ट – १८ हजार
नोकरी ठिकाण – गोंदिया
अर्ज पद्धती – ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, जिल्हा परिषद, गोंदिय.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०५ जानेवारी २०२४
भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘जिल्हा परिषद, गोंदिया’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑफलाइन म्हणजेच पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच ५ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे.