Jalgaon Rains: चाळीसगावकरांची झोप उडाली; एकाच दिवशी तब्बल १२३ मि.मी. पाऊस!

हायलाइट्स:

  • चाळीसगाव तालुक्यात विक्रमी पावसाची नोंद.
  • एकाच रात्रीत कोसळला १२३ मिलीमीटर पाऊस.
  • मुसळधार पावसामुळे तालुक्यात भीषण परिस्थिती.

जळगाव: जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात एकाच दिवसात रेकॉर्डब्रेक १२३ मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात चाळीसगावात एकाच दिवशी झालेला हा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. रात्रभर तालुक्यात पाऊस कोसळत होता. दरम्यान, जळगाव तालुक्यात देखील मंगळवारी पावसाने हजेरी दिली. ( Jalgaon Chalisgaon Rain Update )

वाचा:जळगावात पावसाचं रौद्र रूप; १५ गावांना पुराचा वेढा, दोघांचा बुडून मृत्यू

जळगाव जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. चाळीसगाव तालुक्याला पावसाने अक्षरश झोडपून काढले आहे. तितूर नदीला पूर आला आहे. एकीकडे चाळीसगाव तालुक्यात १२३ मि.मी. पावसाची नोंद झाली असताना, इतर तालुक्यांमध्ये मात्र २५ मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झालेला नाही. ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात सरासरी १९६ मि.मी. पाऊस होत असतो, त्यापैकी आतापर्यंत १५२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

वाचा: पावसाचा हाहाकार! ‘या’ जिल्ह्यात झाली ढगफुटी, अनेक गावांना सतर्कतेचा इशारा

जळगाव शहरातही मंगळवारी पावसाने हजेरी लावली. सकाळी १० वाजता सुमारे १५ ते २० मिनिटे पाऊस झाला. दुपारी देखील अर्धातास शहरात पावसाने हजेरी लावली तर सायंकाळी ६ वाजेपासून शहरात पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने जळगावकरांना दिलासा मिळाला. जिल्ह्यात आतापर्यंत ४१८ मि.मी. पाऊस झाला आहे. एकूण सरासरीच्या टक्केवारीत ८२ टक्के हा पाऊस आहे. चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक पाऊस १४४ टक्के पाऊस झाला आहे तर चोपडा तालुक्यात सर्वात कमी ५२.५ टक्के पाऊस झाला आहे.

आज झालेला तालुकानिहाय पाऊस ( मि.मी. )

जळगाव -१३
भुसावळ- ११.७
यावल- ११.२
रावेर- ११.७
मुक्ताईनगर-६.१
अमळनेर- १३.१
चोपडा- ८,६
एरंडोल-१३.८
पारोळा- १४.३
चाळीसगाव- १२३.२
जामनेर- ३१.४
पाचोरा- २०.४
भडगाव-१९.१
धरणगाव-११.६
बोदवड-१७.९

पावसामुळे भीषण स्थिती

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात मुसळधार पावसाने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील १५ गावे पुरामुळे प्रभावित झाली आहेत. शेकडो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. २५० ते ३५० जनावरे वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे तर दुसरीकडे स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत एका वृद्धेचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला आहे. कलाबाई सुरेश पवार (वय ६०, रा. वाकडी, ता. चाळीसगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. एका अनोळखी इसमाचा मृतदेह देखील वाहून आल्याची माहिती मिळाली आहे.

वाचा:परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री निधीत जमा केले ५० हजार रुपये; कारण…

Source link

chalisgaon floods latest newschalisgaon rains latest updatejalgaon chalisgaon rain updatejalgaon rainsJalgaon Rains Latest Newsकलाबाई सुरेश पवारचाळीसगावचाळीसगाव तालुक्यात मुसळधारजळगावतितूर नदीला पूर
Comments (0)
Add Comment