गाडीला रेस करण्याच्या सवयीने घात केला, भरधाव स्कुटी भिंतीवर आपटून शाळकरी मुलाचा मृत्यू

सातारा : खंडाळा तालुक्यातील म्हावशी येथील इयत्ता सहावीत शिकणारा संस्कार लक्ष्मण राऊत यास कोणाचीही गाडी घेऊन, गाडी रेस करण्याची मोठी हौस होती. मात्र, हीच हौस आज या मुलाच्या जीवघेणी पडल्याने, संस्कार राऊत याच्या अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत माहिती अशी की, संस्कार हा अहिरेश्वर विद्यालय अहिरे ( ता. खंडाळा ) येथे इयत्ता सहावीमध्ये शिकत होता. या मुलाला नेहमी कोणाचीही गाडी घेऊन, गाडी जागेवर उभे करून, रेस करण्याची मोठी हौस होती. असाच त्याने या गावातील एका स्कुटीवर (दुचाकी ) बसून रेस तो करत होता. मात्र, याचवेळी गाडीने अचानक वेग घेतल्याने ही गाडी भरधाव वेगात समोर असणाऱ्या कठड्याला तसेच भिंतीवर जोरात आढळली. या अपघातात संस्कार राऊत हा गंभीर जखमी झाला. यावेळी गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे.

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी १० वर्षीय मुलीवर काळाचा घाला, आईस्क्रीम घेऊन घरी जात असताना….

दरम्यान, यावेळी या गाडीच्या पाठीमागे आजूबाजूला उभे असणारे लोक हे धावत या मुलाला वाचविण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, हा प्रयत्न अयशस्वी ठरला. या अपघातात संस्कार हा गंभीर जखमी झाला. यावेळी या मुलाला खंडाळा येथे खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांनी लोणंद किंवा शिरवळला हलवण्याचे सांगितल्यानंतर लोणंदला एका खासगी दवाखान्यात दाखल करताच संस्कार लक्ष्मण राऊत मयत झाल्याचे सांगितले. या घटनेमुळे म्हावशी गावावर शोककळा पसरली आहे. अनेकांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली आहे. खंडाळा पोलीस स्टेशनला या घटनेची नोंद झाली आहे. खंडाळा पोलीस तपास करत आहेत.

Source link

road accidentsatara newsscooty accidentscooty collapsed on wallसातारा मराठी बातम्यास्कुटीचा अपघात
Comments (0)
Add Comment